Padma awards 2024 : प्रजासत्ताक दिनाचे (Republic Day 2024) औचित्य साधत केंद्र सरकारने पद्म पुरस्काराची घोषणा केली आहे. पाच जणांना पद्मविभूषण, सतरा जणांना पद्मभूषण, ११० जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले आहेत. यंदाही तळागाळात राहून आपले कर्तव्य बजाविणाऱ्यांनाही गौरविण्यात येत आहे. या यादीत महाराष्ट्रातील अनेक जणांचा समावेश आहे. माजी उपराष्ट्रपती नेते व्यंकय्या नायडू यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. तर माजी राज्यपाल राम नाईक व अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.
पद्मविभूषण पुरस्कार- वैजयंतीमाला बाली -कला -तमिळनाडू), के. चिरंजीवी (कला -आंध्र प्रदेश), बिंदेश्वर पाठक (मरणोत्तर)-समाजसेवा-बिहार), पी सुब्रह्मण्यम (कला-तामिळनाडू)
पद्मभूषण पुरस्कार बावीस जणांना जाहीर झाले आहेत. त्यातील सहा नावे महाराष्ट्रातील आहेत. साहित्य व पत्रकारिता क्षेत्रातून हॉर्मुसजी एन. कामा, वैद्यकीय क्षेत्रातून अश्विन बालचंद मेहता, सार्वजनिक व्यवहार क्षेत्रातून राम नाईक यांना, कला क्षेत्रातून दत्तात्रय अंबादास राजदत्त, कला क्षेत्रातून प्यारेलाल शर्मा, साहित्य व शिक्षण क्षेत्रीतून कुंदन व्यास यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाले आहेत. महाराष्ट्रातील आंतरराष्ट्रीय मल्लखांब प्रशिक्षक उदय विश्वनाथ देशपांडे, औषध क्षेत्रातून मनोहर डोळे, साहित्य व शिक्षणासाठी झाकीर आय काझी, समाजसेवेसाठी शंकरबाबा पापळकर यांनी पदमश्री पुरस्कार जाहीर झालेत.
Loksabha Election 2024 : ईशान्य मुंबईत पुन्हा संजय पाटील-मनोज कोटक भिडणार?
पार्वती बरुआ यांना पद्मश्री
हत्तीचा माहुत म्हटले पुरुषच असते. परंतु आसाममधील ६७ वर्षीय पार्वती बरुआ यांना सामाजिक कार्यासाठी (पशु कल्याण) साठी पद्मश्री जाहीर झाला आहे. त्या पहिल्या महिला माहुत म्हणून परिचित आहे. या सर्वसामान्य व्यक्तीचा गौरव करण्यात येत आहे. इतर काही पद्मश्री विजेते-जागेश्वर यादव- छत्तीसगड सामाजिक कार्य (आदिवासी),चामी मुर्मू –झारखंड सामाजिक कार्य (पर्यावरण)
गुरविंदर सिंग – हरियाणा, सामाजिक कार्य (अपंग), सत्य नारायण बलेरी – केरळ (कृषी), दुक्खु माझी – पश्चिम बंगाल सामाजिक कार्य (पर्यावरण)के चेल्लामल –अंदमान निकोबार (शेती),संगथंकिमा – मिझोराम, सामाजिक कार्य, हेम चंद्र माझी- छत्तीसगड (आयुष), यानुंग जामोह लेगो –अरुणाचल प्रदेश (कृषी),सोमन्ना – कर्नाटक, सामाजिक कार्य (आदिवासी),
Padma Awards : पद्म पुरस्कारांची घोषणा, महाराष्ट्रातील उदय देशपांडेंना पद्मश्री, पाहा यादी
सर्वेश्वर बासुमेतेरी – आसाम,प्रेमा धनराज – कर्नाटक (औषध), याज्की मोनक्शॉ इटालिया – गुजरात शांती देवी पासवान आणि शिवन पासवान – गोडना चित्रकार, रतन कहार – भादू लोकगायक, अशोक कुमार बिस्वास – विपुल टिकुली चित्रकार, बालकृष्णन सदनम पुथिया वीटिल – प्रतिष्ठित कल्लुवाझी कथकली नृत्यांगना, उमा माहेश्वरी डी – स्त्री हरिकथा प्रतिपादक
गोपीनाथ स्वेन – कृष्ण लीला गायक, स्मृती रेखा चकमा – त्रिपुरातील चकमा लोईनलूम शाल विणकर,ओमप्रकाश शर्मा – मंच थिएटर कलाकार, नारायण असे काही पद्मश्री विजेते आहेत.
पद्म विभूषण पुरस्कार 2024
पद्म भूषण पुरस्कार 2024
पद्मश्री पुरस्कार 2024