Download App

Padma Awards 2025 : मारुती चितमप्पली, विलास डांगरे, चैत्राम पवार यांना पद्मश्री पुरस्कार

Padma Awards 2025 मारुती चितमपल्ली, होमिओपॅथी चिकित्सक डॉ. विलास डांगरे व चैत्राम पवार यांनाही पद्म पुरस्कार जाहीर झालाय.

  • Written By: Last Updated:

Padma Awards 2025: केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा केलीय. महाराष्ट्रातील प्रतिभावंत लेखक, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पक्षिशास्त्रज्ञ व वन्यजीव अभ्यासक, व्यासंगी संशोधक व वनाधिकारी मारुती चितमपल्ली, होमिओपॅथी चिकित्सक डॉ. विलास डांगरे व चैत्राम पवार यांनाही पद्म पुरस्कार जाहीर झालाय.मारुती चितमपल्ली हे अरण्यऋषी म्हणून ओळखले जातात.

कोण आहेत मारुती चितमपल्ली?

मारुती बी. चितमपल्ली हे मूळचे सोलापूरचे आहेत. परंतु विदर्भामध्ये वनसंपदेसाठी त्यांनी काम केले. ते सोलापूरात लहानाचे मोठे झाले आणि नंतर कोईम्बतूर येथील राज्य वन सेवा महाविद्यालयात प्रवेश केले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर ते महाराष्ट्र राज्य सरकारच्या सेवेत रुजू झाले. महाराष्ट्र राज्य शासनाच्या सेवेतून ते उपमुख्य वनसंरक्षक म्हणून निवृत्त झाले. कर्नाळा पक्षी अभयारण्य, नवेगाव राष्ट्रीय उद्यान, नागझिरा अभयारण्य आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या विकासात त्यांचा मोलाचा वाटा होता. चितमपल्ली यांनी 2006 मध्ये सोलापूर येथील मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले होते. त्यांना 2017 मध्ये महाराष्ट्र शासनाकडून विंदा करंदीकर स्मृती जीवनगौरव पुरस्कारही मिळाला.

चैत्राम पवार महाराष्ट्राचे ‘वनभूषण’

पद्मश्री पुरस्कार झालेले चैत्राम पवार हे धुळे जिल्ह्यातील बारीपाडा येथील आहे. त्यांनी वन, वानिकी तसेच वन्यजीव संवर्धन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलीय. त्यांना राज्य शासनाचा पहिला ‘महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार’ मिळालेला आहे. तर विलास डांगरे हे नागपूरचे प्रसिद्ध होमिओपॅथी चिकित्सक आहेत.

पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेल्यांची यादी

पद्मश्री पुरस्कार- भीम सिंग भावेश, पी दत्तचनमूर्ती, एल हँगथिंग आणि डॉ नीरजा भाटला यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तर गोव्याचे 100 वर्षीय स्वातंत्र्यसैनिक लिबिया लोबो सरदेसाई आणि पश्चिम बंगालचे धकवादक गोकुल चंद्र दास यांनाही पद्मश्रीने सन्मानित करण्यात येणार आहे. या यादीत कुवेतमधील योगसाधक शेख एजे अल सबाह यांचेही नाव आहे.
ट्रॅव्हल ब्लॉगर जोडपे ह्यू आणि कॉलीन गँटझर यांना पद्मश्रीने सन्मानित केले जाईल.नागालँडचे फळ शेतकरी एल हँगथिंग आणि पुद्दुचेरीतील संगीतकार पी दत्चनामूर्ती यांनाही पद्मश्रीने सन्मानित करण्यात येणार आहे.मध्य प्रदेशातील सामाजिक उद्योजिका सायली होळकर, जयपूरच्या प्रसिद्ध लोकगायिका बतूल बेगम यांना पद्म पुरस्कार जाहीर झालाय.

पद्मश्री पुरस्कार विजेते

– एल हैंगथिंग (नागालँड, फळ उत्पादक शेतकरी)

– हरिमन शर्मा (हिमाचल प्रदेश)

– जुमदे योमगम गॅमलिन (अरुणाचल प्रदेश)

– जोयनाचरण बाथरी (आसम)

– नरेन गुरुंग (सिक्किम)

– शेखा ए जे अल सबा (कुवैत)

– निर्मला देवी (बिहार)

– भीम सिंह भावेश (बिहार)

– राधा बहिन भट्ट (उत्तराखंड)

– सुरेश सोनी (गुजरात)

– पंडीराम मंडावी (छत्तीसगढ़)

– जोनास मैसेट (ब्राजील)

– जगदीश जोशीला (मध्य प्रदेश)

– हरविंदर सिंह (हरियाणा)

– भेरू सिंह चौहान (मध्य प्रदेश)

– वेंकप्पा अम्बाजी सुगतेकर (कर्नाटक)

– पी दत्चानमूर्ति (पुडुचेरी)

– लीबिया लोबो सरदेसाई (गोवा)

– गोकुल चंद्र दास (पश्चिम बंगाल)

– ह्यूग गैंटज़र (उत्तराखंड)

– कोलीन गैंटज़र (उत्तराखंड)

– डॉ. नीरजा भाटला (दिल्ली)

– सायली होळकर (मध्य प्रदेश)

follow us

संबंधित बातम्या