Pahalgam Terror Attack : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकार आता लष्करी करावाई करण्याची तयारी करत असल्याची माहिती समोर आली आहे. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात (Pahalgam Terror Attack) 27 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानी नागरिकांना 27 एप्रिलपर्यंत भारत सोडण्याचे आदेश दिले आहे.
तर दुसरीकडे सिंधू पाणी करार (Indus Water Treaty) देखील भारत सरकारने रद्द केला आहे. तर आता समोर आलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकार लष्करी पर्यायांचा विचार करत आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या अध्यक्षेखाली झालेल्या सीसीएसच्या बैठकीत केंद्र सरकारने पाकिस्तानविरोधात आक्रमक भूमिका घेत सिंधू पाणी करार आणि पाकिस्तानी नागरिकांसाठी व्हिसा सेवा स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. तर आता समोर आलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारकडून पाकिस्तानविरोधात लष्करी कारवाई करण्याची तयारी करण्यात येत आहे. कुठे आणि कधी हल्ला करायचा याबाबत सरकार अधिकाऱ्यांशी चर्चा करत असल्याची देखील माहिती समोर आली आहे.
असीम मुनीर मास्टरमाइंड
सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या हल्ल्यापाठीमागे पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर आहे. भारतातील समुदायांमध्ये फूट पाडण्याच्या आणि पाकिस्तानमधील आर्थिक संकट आणि अंतर्गत अशांततेच्या पार्श्वभूमीवर लोकप्रियता मिळवण्यासाठी जनरल मुनीर यांनी हल्ला केला असा भारत सरकारचा अंदाज आहे.
… तर कारवाई करु, CM फडणवीसांचा ‘त्या’ प्रकरणात आमदार संजय गायकवाडांना इशारा
तर दुसरीकडे गुरुवारी बिहार येथील एका सभेत बोलताना आता दहशतवाद्यांचे उरलेले अड्डे नष्ट करण्याची वेळ आली आहे. असं पंतप्रधान मोदी म्हणाले होते. त्यामुळे भारत लवकरच पाकिस्तानवर लष्करी कारवाई करणार असल्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळात सुरु आहे.