Download App

Pahalgam Terror Attack: ‘अल्लाहू अकबर’ म्हणणाऱ्या झिपलाइन ऑपरेटर व पर्यटकाची NIA चौकशी

  • Written By: Last Updated:

Pahalgam Terror Attack : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममधील (Pahalgam Terror Attack) बैसरण खोऱ्यामध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला. त्यात 27 हून अधिक पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्याचा राष्ट्रीय तपास संस्थेकडून (NIA)कडून तपास करण्यात येत आहे. हल्ल्याचा वेळी एक पर्यटक हा या भागात झिपलाइन करत होता. त्यावेळी तो आपल्या मोबाइलमध्ये शूटिंग करत होता. त्यावेळी पर्यटकांवर हल्ला झालेली घटना मोबाइलमध्ये कैद झाली. परंतु झिपलाइनला पर्यटकाला सोडण्यासाठी झिपलाइन ऑपरेटर हा मोठ्याने अल्लाहू अकबर म्हटले आहे. आता त्या ऑपरेटरची एनआयएने चौकशी सुरू केली आहे. पर्यटक ऋषी भट्ट यांच्या मोबाइलमध्ये हल्ल्याची शूटिंग आली आहे. या पर्यटकाकडे चौकशी करण्यात आला आहे.

दहशतवाद्यांकडे धर्म विचारून गोळ्या घालण्यासाठी वेळ? आधी वादग्रस्त वक्तव्य…आता यु-टर्न, वडेट्टीवारांनी मागितली पीडित कुटुंबांची माफी

ऋषी भट्ट हे झिपलाइनचा आनंद घेत होते. त्याचवेळी खाली दहशतवाद्यांकडून गोळीबार सुरू होता. ऋषी भट्ट यांना खाली काय चालले होते, याची माहिती नव्हते. ते ओरडून झिपलाइनचा आनंद मोबाइलमध्ये आनंद घेत होते. परंतु झिपलाइन ऑपरेट करत असलेल्या व्यक्ती भट्ट यांना धक्का देत असताना तो अल्लाहू अकबर असा नारा लावत होता. त्यानंतर डोके बाजूला हलवून हावभाव केला. त्यानंतर दोन्ही दिशांनी गोळीबार सुरू झाला. पर्यटक हा झिपलाइनवर असताना तो बचाविला. परंतु त्याला वाचविण्यासाठी झिपलाइन ऑपरेटरने काहीच केले नाही. त्यामुळे झिपलाइन ऑपरेटरवर संशय बळविला आहे. पर्यटक ऋषी भट्ट व झिपलाइन ऑपरेटर यांची चौकशी करण्यात येत आहे.

मोठी बातमी! भारतीय लष्कराला मोठं यश, पहलगाम हल्ल्यातील सर्व दहशतवाद्यांना घेरलं

पर्यटकांच्या सहली असताना
अल्लाहू अकबरचा घोषणा देत नाहीत

स्थानिक लोक पर्यटकांच्या सहली घेत असताना “अल्लाहू-अकबर” असा नारा देत नाहीत. परंतु या ऑपरेटरने हा नारा दिला आहे. पर्यटकाच्या मोबाइलमध्ये गोळीबाराचे चित्रिकरण आले आहे. त्याच लोक त्यांच्या जीवासाठी धावताना दिसत आहे. तर काही लोकांना गोळ्या घालण्यात येत आहेत. झिपलाइन ऑपरेटरला काय घडत आहे याची जाणीव होती. तरी तो शांत राहिला. पर्यटकाला धोका असूनही, राईड चालू ठेवली, यामुळे या ऑपरेटर संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

follow us