Rajnath Singh : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान विरुद्ध देशभरात संतापाची (Pahalgam Terror Attack) लाट उसळली आहे. याच दरम्यान संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज (Rajnath Singh) दहशतवादाला पोसणाऱ्या पाकिस्तानला कठोर शब्दांत इशारा दिला आहे. देशाकडे वाईट नजरेनं पाहणाऱ्यांना जशास तसं उत्तर दिलं जाईल. भारतीय सैनिकांच्या साथीने देशाच्या सीमांची सुरक्षा सुनिश्चित करणं ही संरक्षणमंत्री म्हणून माझी जबाबदारी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या कार्यकाळात तुम्हाला जे वाटतं तसं निश्चित होईल, असे राजनाथ सिंह म्हणाले.
राजनाथ सिंह पुढे म्हणाले, देशातील लोकांना जसं वाटतं त्याच भाषेत पंतप्रधान मोदी शत्रूला उत्तर देतील. पीएम मोदींच्या नेतृत्वात तुम्हाला जसे वाटेल तसेच घडणार. आपल्या पंतप्रधानांना तुम्ही चांगल्या प्रकारे जाणता. त्यांच्या कार्यशैलीशी परिचित आहात. जोखीम स्वीकारण्याचं त्यांचं कौशल्यही तुम्हाला माहिती आहे. देशाच्या विरोधात जे असतील त्यांना उत्तर देण्याचं काम ते करतील.
भारताचा वॉटर स्ट्राइक! बगलिहार धरणातून रोखले चिनाब नदीचे पाणी; पाकिस्तानला जबर दणका
सन 2047 पर्यंत देशाला एक विकसित राष्ट्र करण्याचे लक्ष्य पंतप्रधानांनी निश्चित केले आहे. लक्ष्य लहान नाही. पण तुम्ही निश्चिंत राहा. लक्ष्य निश्चितच पूर्ण होणार आहे. जागतिक पातळीवर भारताची प्रतिष्ठा वाढली आहे. भारताचं वजन वाढलं आहे. आधी जागतिक मंचावर भारताचं म्हणणं ऐकलं जात नव्हतं. पण आज आंतरराष्ट्रीय मंचावर भारत काही बोलला तर सगळं जग ऐकतं राहातं असे राजनाथ सिंह म्हणाले.
पहलगाम हल्ल्यातील तपासात अनंतनागमध्ये 25 पेक्षा जास्त लोकल टूरिस्ट गाइड्सची चौकशी करण्यात आली आहे. स्थानिक लोकांच्या मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही असे तपास यंत्रणांचे मत आहे. ज्यांनी कुणी अतिरेक्यांची मदत केली त्यांचा शोध घेतला जात आहे. भारताकडून पाकिस्तान विरोधात कठोर निर्णय घेतले जात आहेत. त्यामुळे पाकिस्तानात मोठी खळबळ उडाली आहे.
22 एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी पहलगाम येथे हिंदू पर्यटकांची हत्या केली. त्यांचा धर्म विचारून पर्यटक हिंदू असल्याची खात्री करून घेतली आणि नंतर त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. दहशतवाद्यांच्या या कृत्याचा जगभरातून निषेध करण्यात आला. भारत सरकारनेही तेव्हापासून पाकिस्तानशी उरलेसुरले संबंधही तोडून टाकले आहेत. पाकिस्तानला सर्वाधिक धक्का देणारा निर्णय भारताने घेतला. सिंधू पाणीवाटप करार स्थगित करून भारताने पाकिस्तानला मोठ्या संकटात टाकले आहे.
एअर इंडियाचं विमान अचानक अबूधाबीत उतरलं; इस्त्रायलमधील हल्ल्यानंतर दिल्लीला परतणार