एअर इंडियाचं विमान अचानक अबूधाबीत उतरलं; इस्त्रायलमधील हल्ल्यानंतर दिल्लीला परतणार

एअर इंडियाचं विमान अचानक अबूधाबीत उतरलं; इस्त्रायलमधील हल्ल्यानंतर दिल्लीला परतणार

New Delhi News : नवी दिल्लीहून इस्त्रायलची राजधानी तेल अवीवला जाणारे एअर इंडियाचे (Air India) विमान अचानक अबू धाबीकडे डायवर्ट करण्यात आले. याठिकाणी विमान लँड करण्यात आले आणि येथूनच दिल्लीला परतणार आहे. पण, तेल अवीवला जाणारे विमान अचानक युएईतील अबू धाबीला का उतरवण्यात आले या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे. तेल अवीव विमानतळाजवळ मिसाइल अटॅक झाला होता. यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

एअर इंडियाचे विमान तेल अवीवकडे निघाले होते. लँडिंग करण्याच्या एक तास आधीच मिसाइल हल्ल्याची घटना घडली. हा हल्ला तेल अवीव विमानतळाजवळ झाल्याचे सांगण्यात येत आहे. न्यूज एजन्सीनुसार आता विमान तेल अवीवला जाणार नाही. पुन्हा दिल्लीला माघारी परतणार आहे. या घटनेनंतर विमानाला डायवर्ट करून अबूधाबीत उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

भारताचा वॉटर स्ट्राइक! बगलिहार धरणातून रोखले चिनाब नदीचे पाणी; पाकिस्तानला जबर दणका

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता तेल अवीव येथून दिल्लीकडे येणारी सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. या घटनेबाबत एअर इंडियाकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तेल अवीव विमानतळ प्रशासनाने सर्व उड्डाणे रद्द केली आहेत.

बॅलेस्टिक मिसाइलद्वारे केला हल्ला

यमनच्या हुथी बंडखोरांनी इस्त्रायलची राजधानी तेल अवीवच्या बेन गुरियन विमानतळावर आज बॅलेस्टिक मिसाइलने हल्ला केला. या हल्ल्यानंतर इस्त्रायलमध्ये मोठी खळबळ उडाली. पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी तातडीने एक बैठक आयोजित केली. या बैठकीत नेतान्याहू यांनी डिफेन्स फोर्सच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. हुथी बंडखोरांवर कसा हल्ला करायचा यावरही या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते.

इस्त्रायली मीडिया रिपोर्ट्सनुसार या हल्ल्याला रोखता आले नाही. त्यामुळे मिसाइल सरळ विमानतळावर कोसळली. या हल्ल्यात सहा प्रवासी जखमी झाले आहेत. या जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या हल्ल्याआधीच इस्त्रायलने विमानतळावरील टेक ऑफ आणि विमानांचे लँडिंग रोखले होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube