Download App

जैसलमेर, पठाणकोट, होशियापूरवर पाकिस्तानचा हल्ला; पाकिस्तानची एफ 16, जेएफ 17 विमाने पाडली

पाकिस्तानने जम्मू आणि आणखी काही ठिकाणी ड्रोन हल्ले करून युद्धाला तोंड फोडले आहे. 

India Pakistan War : पाकिस्तानने जम्मू आणि आणखी काही ठिकाणी ड्रोन हल्ले करून युद्धाला तोंड फोडले आहे.  सीमेवर भारताच्या एस 400 सिस्टिमने सर्व ड्रोन हल्ले परतवून लावले आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावा दरम्यान गुरुवारी जम्मू येथील एयरस्ट्रिपवर रॉकेटने हल्ला करण्यात आला. भारतीय सैन्याच्या सतर्कतेने हा हल्लाही परतवून लावण्यात आला. एस 400 डिफेन्स सिस्टीमने तत्काळ कार्यवाही करत पाकिस्तानच्या सर्व आठ मिसाइल्सना हवेतच नष्ट केले. सैन्याच्या सूत्रांकडील माहितीनुसार जम्मूचे विमानतळ टार्गेटवर होते. दरम्यान, राजस्थानच्या जैसलमेर भागात भारतीय सैन्याने पाकिस्तानचे F 16 विमान पाडले. चिनी बनावटीची दोन JF 17 विमानं भारताने पाडल्याची कबुली पाकिस्तानी अधिकाऱ्यांनीच दिली आहे.

पाकिस्तानची तीन विमाने पाडली

भारतीय सैन्याच्या एअर डिफेन्स युनिट्सने पाकिस्तानचे एफ 16 फायटर जेट पाडले. ही कारवाई एलओसी जवळ झाली. पाकिस्तानी फायटर जेट भारताच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करत होते. त्याचवेळी या विमानाला हाणून पाडण्यात आले. भारताने पाकिस्तानची एकूण तीन विमाने पाडल्याची माहिती समोर येत आहे. यात एक एफ 16 आणि दोन जेएफ 17 विमानांचा समावेश आहे.

युद्ध पेटलं ! जम्मूत पाकिस्तानचा ड्रोन अटॅक, सायरन वाजले; विमानतळ, रेल्वे स्टेशनवर हल्ल्याचा प्रयत्न

8 मिसाइल आणि 16 ड्रोन्स नष्ट

याआधी पाकिस्तानाने भारतात अनेक ठिकाणी हल्ल्याचा प्रयत्न केला होता. परंतु, भारताच्या एस 400 डिफेन्स सिस्टीमने पाकिस्तानचे मनसूबे हाणून पाडले. भारताने एक एफ 16 आणि दोन जेएफ 17 फायटर जेट यांच्याव्यतिरिक्त 8 मिसाइल् आणि 16 ड्रोन्स नष्ट करण्यात आले आहेत.

जम्मूचे विमानतळ होते टार्गेट

पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्याला भारताने चोख प्रत्युत्तर दिले आहे. भारताची एस 400 सिस्टीम पूर्ण अॅक्टिव्ह झाली आहे. पाकिस्तानचे अनेक ड्रोन्स हवेतच नष्ट करण्यात आले आहेत. जम्मूत नेमके किती ड्रोन आले याची नेमकी माहिती अजून समोर आलेली नाही. जम्मूतील विमानतळ पाकिस्तानचं टार्गेट होतं अशी माहिती समोर आली आहे. विमानतळाच्या दिशेने आठ ड्रोन येत होते. पण हे सर्व ड्रोन्स हवेतच पाडण्यात आले. राजस्थानच्या जैसलमेरमध्येही पाकिस्तानने हल्ल्याचा प्रयत्न केल्याची माहिती मिळाली आहे. जम्मू, पठानकोट, जैसलमेर, होशियारपूरवर ड्रोन हल्ला करण्यात आला आहे. पाकिस्तानच्या या हल्ल्यानंतर ब्लॅकआऊट करण्यात आले आहे.

Tags

follow us