युद्ध पेटलं ! जम्मूत पाकिस्तानचा ड्रोन अटॅक, सायरन वाजले; विमानतळ, रेल्वे स्टेशनवर हल्ल्याचा प्रयत्न

India Pakistan War : पाकिस्तानकडून भारताच्या कुरापती काढणं सुरुच आहे. आताच हाती आलेल्या माहितीनुसार जम्मूच्या विविध भागांत ड्रोनद्वारे हल्ला केला गेला आहे. जम्मूत काही ठिकाणी मोठा आवाज ऐकू आला. यानंतर येथे सॉयरन वाजू लागले. संपूर्ण जम्मूत ब्लॅकआऊट करण्यात आले. लोकांना घरातच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. यानंतर जम्मूत एअर डिफेन्स सिस्टीम अॅक्टिव्ह करण्यात आली. जम्मूत पाच ते सहा स्फोटांचे आवाज ऐकू आल्याचे सांगतिले जात आहे. ड्रोन किंवा मिसाइलद्वारे हल्ला करण्यात आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आकाशात ड्रोन दिसल्यानंतर जम्मूत अलर्ट जारी करण्यात आला. येथे अनेक ठिकाणी ड्रोनने हल्ले करण्यात आले. कुपवाडा भागात गोळीबार झाल्याची माहिती समोर येत आहे. भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमने ड्रोन पाडले आहेत. आरएसपोरा भागात पाकिस्तानी ड्रोन नष्ट करण्यात आले. या दरम्यान पाकिस्तानच्या एकूण आठ मिसाइल्स नष्ट करण्यात आल्या. पंजाब राज्यातील गुरदासपूर आणि अमृतसर मध्येही ब्लॅकआऊट करण्यात आले आहे.
#WATCH | Sirens being heard in Akhnoor, Jammu and Kashmir
More details awaited. pic.twitter.com/eiGdyj14Tq
— ANI (@ANI) May 8, 2025
मिळालेल्या माहितीनुसार पठानकोट एअरबेस परिसरात सायरन वाजत आहेत. हलका सुजानपूर भागात पाकिस्तानी ड्रोन दिसले आहेत. यानंतर भारतीय सैन्यावर या ड्रोन्सवर जोरदार फायरिंग सुरू केली. काल रात्री सुद्धा पाकिस्तानने भारतातील 15 शहरांवर हल्ल्याचा प्रयत्न केला होता. परंतु, भारताच्या एस 400 डिफेन्स सिस्टीमने पाकिस्तानचे सगळे ड्रोन आणि मिसाइल्स नष्ट केल्या.
जम्मूचे विमानतळ होते टार्गेट
पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्याला भारताने चोख प्रत्युत्तर दिले आहे. भारताची एस 400 सिस्टीम पूर्ण अॅक्टिव्ह झाली आहे. पाकिस्तानचे अनेक ड्रोन्स हवेतच नष्ट करण्यात आले आहेत. जम्मूत नेमके किती ड्रोन आले याची नेमकी माहिती अजून समोर आलेली नाही. जम्मूतील विमानतळ पाकिस्तानचं टार्गेट होतं अशी माहिती समोर आली आहे. विमानतळाच्या दिशेने आठ ड्रोन येत होते. पण हे सर्व ड्रोन्स हवेतच पाडण्यात आले. राजस्थानच्या जैसलमेरमध्येही पाकिस्तानने हल्ल्याचा प्रयत्न केल्याची माहिती मिळाली आहे.