India-Pakistan Ceasefire : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव आता निवळण्यास (India Pakistan War) सुरुवात झाली आहे. कारण नुकताच युद्धविराम झाला (India Pakistan Ceasefire) आहे. दोन्ही देशांनी याची अधिकृत घोषणाही केली आहे. युद्धविरामाची घोषणा होण्याआधी भारताने पाकिस्तानचं खोटं बोलणं जगासमोर आणलं. पाकिस्तानने यानंतर नेमकं काय स्पष्टीकरण दिलं याची माहिती घेऊ या..
पाकिस्तानने आपल्या मोहिमेत भारतीय वायूसेनेचं एअरबेस, एस 400 सिस्टिम, वीज आणि सायबर तंत्रावर हल्ला केल्याचा दावा केला होता. भारताने पाकिस्तानचा हा दावा स्पष्ट शब्दांत नाकारला. देशाच्या सुरक्षेला कोणतेच नुकसान झालेलं नाही असं ठणकावून सांगण्यात आलं. पाकिस्तानने शनिवारी सकाळी भारताविरुद्ध एका सैन्य अभियानाची घोषणा केली होती. याआधी भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले होते. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने हे ऑपरेशन राबवले होते. त्यानंतर दोन्ही देशांत तणाव प्रचंड वाढला होता.
ब्रेकिंग : अखेर भारत-पाकिस्तानमध्ये युद्धविराम; भारताकडून अधिकृत घोषणा
आता पाकिस्तानने नेमक्या कोणत्या पाच गोष्टी जगाला खोट्या सांगितल्या याची माहिती घेऊ या..
1. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी पाकिस्तानचे दावे खोडून काढले. सूरतगढ, सिरसा आणि उधमपूर येथे एस 400 रडार बेसह कोणत्याही सैन्य आणि नागरिक ठिकाणांनी नुकसान झाले नसल्याचे सांगितले.
2. पाकिस्तानने केलेल्या बहुतांश घोषणा या चुकीची माहिती, खोटेपणा आणि दुष्प्रचारावर आधारीत होत्या. भारताने फक्त प्रत्युत्तराची कारवाई केली. कारवाई करतानाही भारताने जबाबदारीचे भान राखले होते.
3. कर्नल सोफिया कुरेशी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की पाकिस्तानच्या जेएफ 17 विमानाने भारताच्या एस 400 आणि ब्रह्मोस मिसाइल बेसचे नुकसान केले हा दावा पूर्णपणे चुकीचा आहे. वायूसेनेच्या विंग कमांडर व्योमिका सिंह आणि कर्नल सोफिया कुरेशी यांनी सांगितले की पाकिस्तानने भ्रामक पद्धतीने खोटा प्रचार केला.
4. भारतातील पठाणकोट, भटिंडा, नलिया, सिरसा, जम्मू आणि भूज या ठिकाणच्या एअरबेसचे नुकसान झाल्याचा दावा पाकिस्तानकडून केला जात होता. व्यास आणि चंडीगढ येथेही हत्यारांच्या डेपोचे नुकसान झाल्याची खोटी माहिती पाकिस्तानकडून सांगितली जात होती. परंतु, असे काहीही झाले नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.
“नाहीतर उद्ध्वस्त होऊ..” युद्धविरामासाठी पाकिस्तानची अमेरिकेकडे गयावया; पडद्यामागं काय घडलं?
5. भारतीय सैन्याने धार्मिक स्थळांवर हल्ला केल्याचा दावा पाकिस्तानकडून केला जात होता. परंतु, पाकिस्तानचा हा दावाही खोटा असल्याचे भारतीय सैन्याने स्पष्ट केले. कर्नल सोफिया कुरेशी म्हणाल्या, भारत धर्मनिरपेक्ष देश आहे. भारतीय सैन्य संविधानाचे मूल्यांचा पूर्ण सन्मान करते. आम्ही कोणत्याही धार्मिक स्थळांवर हल्ला केलेला नाही.