Pakistan Jaffer Express Rescued 33 Terrorists Killed : बलुचिस्तानमधील जाफर एक्सप्रेसवरील (Jaffer Express) दहशतवादी हल्ल्याविरुद्ध पाकिस्तानी (Pakistan) सैन्याची कारवाई अखेर पूर्ण झालीय. सुमारे 30 तास चाललेल्या या कारवाईत पाकिस्तानी सैन्याने बलुच लिबरेशन आर्मी (बीएलए) च्या 33 सैनिकांना ठार (Terrorists Killed) मारलंय. पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी याची पुष्टी केलीय. त्यांनी सांगितलं की, या कारवाईदरम्यान फ्रंटियर कॉर्प्स (एफसी) चे चार सैनिक शहीद झाले, तर 21 प्रवाशांचा अगोदरच मृत्यू झाला होता.
मंगळवारी, बलुच अतिरेक्यांनी जाफर एक्सप्रेसचे अपहरण केलं होतं आणि प्रवाशांना ओलीस ठेवलं होतं. यानंतर, पाकिस्तानी सैन्याने परिसराला वेढा घातला आणि दहशतवाद्यांवर कारवाई सुरू (Pakistan Security Force) केली. बोलानच्या डोंगराळ आणि बोगद्यांनी भरलेल्या भागात ही कारवाई झाली, तिथे पाकिस्तानी सैनिकांनी बीएलएच्या आर्मीला कठीण आव्हान देण्याचा प्रयत्न केला. पण पाकिस्तानी सुरक्षा दलांनी धोरणात्मकरित्या सर्व दहशतवाद्यांना संपवलं.
निश्चय नैसर्गिक रंगाच्या होळीचा, संकल्प वसुंधरा रक्षणाचा; पंकजा मुंडेंकडून पर्यावरणपूरक होळीचं अवाहन
कारवाईदरम्यान, अनेक दहशतवादी पळून जाण्याचा प्रयत्न करत होते, परंतु सैन्याच्या कडक घेरावामुळे त्यांनी अखेर आत्मसमर्पण केले. पाकिस्तानी लष्कराने एकाही सैनिकाला जिवंत सोडले नाही आणि सर्वांना ठार मारलं. या कारवाईत कोणताही निष्पाप नागरिक मारला गेला नाही, असा दावा पाकिस्तानी लष्कराने केलाय.
बीएलए बऱ्याच काळापासून बलुचिस्तानमध्ये पाकिस्तान सरकारविरुद्ध फुटीरतावादी चळवळ चालवत आहे. या संघटनेने यापूर्वीही अनेक मोठे हल्ले केले आहेत, परंतु जाफर एक्सप्रेस हल्ल्यानंतर पाकिस्तानी सैन्याने केलेल्या प्रत्युत्तराच्या कारवाईमुळे त्यांना मोठा धक्का बसला आहे. उर्वरित कोणताही दहशतवादी पळून जाऊ नये, म्हणून सुरक्षा यंत्रणा अजूनही परिसरात शोध मोहीम राबवत आहेत.
संग्राम कोते यांना न्याय मिळणार का? अजितदादा पारड्यात विधानपरिषदेचे झुकत माप टाकणार का?
जाफर एक्सप्रेसवरील दहशतवादी हल्ल्याबाबत पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी बलुचिस्तानचे मुख्यमंत्री सरफराज बुगती यांच्याशी चर्चा केली. यावेळी, सीएम बुगती यांनी त्यांना हल्ल्याची ताजी परिस्थिती आणि बचाव कार्याची माहिती दिली. या हल्ल्याला अत्यंत घृणास्पद वर्णन करताना पंतप्रधान म्हणाले की, या भ्याड कृत्याने संपूर्ण देश हादरलाय. परंतु यामुळे पाकिस्तानची शांतता आणि सुरक्षिततेची वचनबद्धता कमकुवत होणार नाही.
हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिक आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना पंतप्रधानांनी श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या कुटुंबियांप्रती तीव्र संवेदना व्यक्त केल्या. ते म्हणाले की, मी शहीदांच्या कुटुंबियांबद्दल मनापासून संवेदना व्यक्त करतो. अल्लाह त्यांना स्वर्गात उच्च स्थान देवो आणि जखमी लवकर बरे व्हावेत. पुढे पंतप्रधान म्हणाले की, पाकिस्तान दहशतवादाविरुद्धची आपली लढाई आणखी मजबूत करेल. त्यांनी सांगितलं की, सुरक्षा दलांनी या हल्ल्यात सहभागी असलेल्या अनेक दहशतवाद्यांना ठार मारलंय.