Who Is India’s Biggest Enemy : मे महिन्यात भारत आणि पाकिस्तान (Pakistan On China) यांच्यात निर्माण झालेल्या तणावामुळे दोन्ही देशांमध्ये संघर्षाचं वातावरण निर्माण झालं होतं. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले होते. या कारवाईत भारतीय लष्कराने पाकिस्तानातील अनेक दहशतवादी तळं उद्ध्वस्त केले. 100 पेक्षा अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात (Who Is India’s Biggest Enemy) आला होता. या काळात दोन्ही देशांनी एकमेकांवर थेट हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सीमारेषेवर परिस्थिती आणखी तापली होती.
याच दरम्यान भारताच्या इतर शत्रू राष्ट्रांबद्दल देखील माहिती समोर आली. भारत विविध देशांशी सौहार्दपूर्ण संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत असतानाच, अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या एका आंतरराष्ट्रीय अहवालामुळे (Pakistan) भारतीय नागरिक कोणत्या देशाला सर्वात मोठा शत्रू मानतात यावर प्रकाश पडला आहे.
लग्नाचे योग, अचानक धनलाभ; आजचा दिवस ‘या’ राशींसाठी असणार खास
प्यू रिसर्चचा अहवाल काय सांगतो?
अमेरिकेतील ‘प्यू रिसर्च सेंटर’ या संस्थेने भारतात एक सर्वेक्षण केले, ज्यामध्ये विविध वयोगटांतील भारतीय नागरिकांनी भाग घेतला. या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले की, 2 टक्के भारतीयांनी अमेरिकेला शत्रू राष्ट्र मानले. 33 टक्के नागरिकांच्या मते चीन हा भारताचा प्रमुख शत्रू आहे. सर्वाधिक 41 टक्के भारतीयांनी पाकिस्तानलाच भारताचा सर्वात मोठा शत्रू असल्याचे मानले. हे टक्केवारीचे आकडे सांगतात की पाकिस्तान आणि चीन या दोन देशांबद्दल भारतीयांमध्ये सर्वाधिक शंका आहे.
पाकिस्तान आणि चीन भारताचे जुने शत्रू
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पाकिस्तान आणि चीनसोबत एकूण पाच युद्धे झाली आहेत. चीनसोबत 1962 मध्ये, तर पाकिस्तानसोबत 1947, 1965, 1971 आणि 1999 मध्ये कारगिल युद्ध झाले. हे दोन्ही देश भारतीय सीमांवर दावा सांगत असतात. चीन सातत्याने अरुणाचल प्रदेशला आपले राज्य असल्याचे म्हणतो, तर पाकिस्तान जम्मू-काश्मीरमध्ये अशांतता पसरवण्यासाठी दहशतवाद्यांना समर्थन देतो. चीनची आंतरराष्ट्रीय राजकारणातील भूमिका देखील भारताला त्रासदायक ठरली आहे. दक्षिण चीन समुद्रात आपली सत्ता प्रस्थापित करून चीन भारताच्या सागरी सुरक्षेला धोका निर्माण करत आहे. शिवाय संयुक्त राष्ट्रसंघासारख्या जागतिक व्यासपीठांवर चीनने अनेकदा पाकिस्तानला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे भारतीयांमध्ये या दोन देशांविषयी तीव्र अविश्वास निर्माण झाला आहे.
कल्याण हादरलं! रुग्णालयात मराठी तरुणीला परप्रांतीयाची बेदम मारहाण, CCTV फुटेज धक्कादायक
पाकिस्तानला उघडपणे पाठिंबा
पाकिस्तानसोबतच्या संघर्षाच्या काळात तुर्की आणि अझरबैजान या देशांनीही पाकिस्तानला उघडपणे पाठिंबा दिला होता. त्यामुळे भारतात या देशांबद्दलही असंतोष व्यक्त केला जातो. जरी हे देश थेट युद्धात सामील नसले, तरी भारतातील जनतेच्या मनात त्यांनी नकारात्मक प्रतिमा निर्माण केली आहे. भारत सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्व राष्ट्रांशी समतोल आणि सौहार्दपूर्ण संबंध ठेवण्याच्या धोरणावर काम करत आहे. मात्र, शेजारील राष्ट्रांशी सतत निर्माण होणारे तणाव आणि भारताच्या भू-राजकीय हितसंबंधांवर होणारे घातक परिणाम लक्षात घेता, भारतीय जनतेचा दृष्टिकोन अधिक कडवट होतो आहे. प्यू रिसर्चच्या निष्कर्षानुसार भारतीय जनता अजूनही पाकिस्तानलाच सर्वात मोठा धोका मानते, त्यानंतर चीन, आणि काही प्रमाणात अमेरिकेबाबतही साशंकता आहे. सीमारेषेवरील संघर्ष, दहशतवाद, आणि आंतरराष्ट्रीय पाठिंब्याच्या राजकारणामुळे या देशांची भारतातील प्रतिमा नकारात्मक ठरली आहे.