Download App

‘गदर’ स्टोरीत ट्विस्ट! सीमा हैदर उत्तर प्रदेश एटीएसच्या ताब्यात, चौकशीत धक्कादायक खुलासे?

Image Credit: letsupp

Seema Haider : प्रियकरासाठी पाकिस्तानातून भारतात आलेल्या पाकिस्तानी महिला सीमा हैदर यांना एटीसच्या पथकाकडून ताब्यात घेण्यात आलं आहे. सीमा हैदरला उत्तर प्रदेशातील नोएडामधून ताब्यात घेतलं आहे. सीमा हैदरने उत्तर प्रदेशातल्या युवकाशी लग्न केल्यानंतर चांगलीच चर्चेत आली होती. युवकाशी लग्न केल्यानंतर दोघांचा संसार सुरु झाला पण अचानक आता एटीएसने तिला ताब्यात घेतल्याने विविध चर्चा सुरु झाल्या आहेत.

‘त्यांच्या मनातलं मी सांगू शकत नाही’; शरद पवारांच्या भेटीनंतर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया

सोमवारी उत्तर प्रदेशातील सीमा हैदरच्या घरी जात एटीएसच्या पथकांनी घराच्या दोन्ही बाजूचा रस्ता बंद केला होता. त्यानंतर सीमा हैदरला घरातून बाहेर काढत पोलिसांनी ताब्यात घेतलंय. पोलिस सीमा हैदरला कुठं घेऊन गेलेत याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नसून चौकशीसाठी नेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

Praveen Darekar यांचं मंत्रिपदासाठी वेटींग; पण विरोधकांचे ‘त्या’ जखमेवरच मीठ

सीम हैदर जेव्हा भारतात आली त्यावेळी पाकिस्तानातून तिच्या संपर्कात कोणी होतं का? याबाबत उत्तर प्रदेश एटीसकडून चाचपणी करण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकरणाचा अधिक तपास करण्यासाठी उत्तर प्रदेश पोलिसांकडून एटीएसची मदत घेण्यात आली आहे.

भारतातल्या युवकाशी विवाह केल्यानंतर सीमा हैदर उत्तर प्रदेशात होती. अशा परिस्थिती सीमा हैदरवर हल्ला होऊ शकतो, त्यामुळे सीमासोबत माध्यमांना बोलण्यासाठी मज्जाव करण्यात आला. सध्या या प्रकरणी चौकशीत मोठे खुलासे होत असून सीमा हैदरच्या भावानंतर काकासुद्धा पाकिस्तानी लष्करात असल्याचं समजतं. त्यामुळे आता या प्रकरणाची सखोल चौकशी केली जात आहे.

विरोधी पक्ष गोंधळलेल्या आणि अवसान गमावलेल्या अवस्थेत; CM शिंदेची खोचक टीका

दरम्यान, पाकिस्तानमधील चार मुलांची आई असलेल्या सीमा हैदरने आपला देश सोडला आणि एका हिंदू व्यक्तीसोबत राहण्यासाठी भारतात आली. सीमा हैदर हिच्या पबजी प्रेमकथेचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानातील एका टोळीने काही दिवसांपूर्वी कश्मोर आणि घोटकी नदीच्या भागातील हिंदू प्रार्थनास्थळांवर आणि समुदायावर हल्ले करण्याची धमकी दिली होती.

त्यानंतर एका हल्लेखोर टोळीने दक्षिण सिंध प्रांतात हिंदू मंदिरावर रॉकेट लाँचरने हल्ला केला. स्थानिक पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोरांनी सिंध प्रांतातील कश्मोर भागात स्थानिक हिंदू समुदायाने बांधलेल्या एका लहान मंदिरावर आणि अल्पसंख्याक हिंदू समुदायाच्या घरांच्या जवळपास हल्ला केला.

सीमा हैदर सचिन मीना या युवकासोबत प्रेमाखातर आल्याचं सांगत आहे. मात्र, ती खरचं प्रेमाखातरच आलीय का? तिचे पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयशी काही संबंध आहेत का? असा संशय असल्यानेच पोलिसांकडून तिची चौकशी सुरु आहे.

Tags

follow us

वेब स्टोरीज