‘त्यांच्या मनातलं मी सांगू शकत नाही’; शरद पवारांच्या भेटीनंतर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया

‘त्यांच्या मनातलं मी सांगू शकत नाही’; शरद पवारांच्या भेटीनंतर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया

NCP MLA Meet Sharad Pawar :  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व आमदार यांनी आज (17 जुलै) पुन्हा एकदा शरद पवार यांची वाय. बी. चव्हाण सेंटर येथे भेट घेतली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांशी संवाद साधला. पक्ष एकसंघ रहावा, यासाठी मंत्री व आमदारांनी शरद पवारांना विनंती केली, असे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.

आजपासून राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. त्या पार्श्वभूमीवर काल (16 जुलै)  राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. त्यानंतर आज राष्ट्रवादीचे नेते व आमदार यांनी शरद पवारांची भेट घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनील तटकरे यांनी  हे देखील उपस्थित होते.

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी चिमटे अन् हशा, शिंदेच्या पॉजवर अजितदादांना जयंत पाटलांचा चिमटा

यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांशी संवाद साधला.  पटेल म्हणाले की, अजित पवार आणि विधीमंडळाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व आमदार ज्येष्ठ नेते शरद पवारांचा आशीर्वाद घेण्यासाठी आले होते. काल सर्व मंत्री, विधानसभा उपाध्यक्ष, खासदार यांनी भेट घेतली होती. काल रविवार असल्यामुळे सर्व आमदार मतदारसंघात होते. पण, विधीमंडळाचे अधिवेशन सुरु झाल्यामुळे सर्व आमदार आज उपस्थित होते. त्यामुळे आमदारांना आशीर्वाद मिळवून देण्यासाठी आम्ही त्यांना भेटायला आलो होतो.

Onion Price: टोमॅटोने महागल्याने सरकार सावध, लासलगावच्या कोल्ड स्टोरेजमध्ये 150 टन कांदा साठवला

सर्व आमदारांनी शरद पवारांचा आशीर्वाद घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एकसंघ रहावा, यासाठी आम्ही काल विनंती केली होती, तशीच विनंती आजही आम्ही केली. पवारसाहेबांनी कालच्याप्रमाणे आजही आमचे म्हणणे ऐकून घेतले. पण, त्यांनी यावर कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यांच्या मनात काय आहे, हे मी आज कसं सांगू शकतो, असेही पटेल म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube