Download App

पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांचे निधन

Parkash singh Badal Passed Away :पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल (Parkash Singh Badal) यांचे मंगळवारी रात्री 8.28 च्या सुमारास निधन झाले. मृत्यूसमयी ते 95 वर्षांचे होते. मिळालेल्या माहितीनुसार, मोहालीतील (Mohali) फोर्टिस रुग्णालयात (Fortis Hospitals)त्यांचा मृत्यू झाला. आता भटिंडा जिल्ह्यातील बादल गावात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अकाली दलाचे ज्येष्ठ नेते प्रकाशसिंग बादल हे पाच वेळा पंजाबचे मुख्यमंत्री होते.

बाबासाहेबांचे पणतू सुजात आंबेडकर राजकारणात सक्रिय…

शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर बादल (Sukhbir Badal) हे त्यांचे पुत्र आहेत. प्रकाशसिंग बादल यांचा जन्म 8 डिसेंबर 1927 रोजी पंजाबमधील अबुल खुराना या छोट्याशा गावात जाट शीख कुटुंबात झाला.

एका वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, शिरोमणी अकाली दल (एसएडी) च्या ज्येष्ठ नेत्याला एका आठवड्यापूर्वी श्वास घेण्यास त्रास होत असल्याच्या तक्रारीनंतर मोहालीच्या फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकाश सिंह बादल यांना सोमवारी आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. सोमवारी संध्याकाळी जारी करण्यात आलेल्या मेडिकल बुलेटिनमध्ये हॉस्पिटलने म्हटले होते की, प्रकाश सिंह बादल अजूनही आयसीयूमध्ये डॉक्टरांच्या जवळच्या देखरेखीखाली आहेत.

पुढील काही दिवसांत ज्येष्ठ एसएडी नेत्याची तब्येत हळूहळू सुधारत राहिल्यास त्यांना खासगी वॉर्डमध्ये हलवले जाऊ शकते, असे रुग्णालयाने सांगितले होते. गेल्या आठवड्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बादल यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि त्यांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या.

पंजाबचे पाच वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या बादल यांना गेल्या वर्षी जूनमध्ये श्वास घेण्यास त्रास झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कोविड नंतरच्या आरोग्य तपासणीसाठी त्यांना फेब्रुवारी 2022 मध्ये मोहाली येथील एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. बादल यांना गेल्या वर्षी जानेवारीमध्ये कोरोना विषाणूची लागण झाली होती आणि त्यांना लुधियाना येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

प्रकाशसिंग बादल यांनी 1947 मध्ये राजकारणात पदार्पण केले. 1957 मध्ये पहिली विधानसभा निवडणूक जिंकली. 1969 मध्ये प्रकाशसिंग बादल पुन्हा आमदार झाले. तर प्रकाशसिंग बादल हे 1970-71, 1977-80, 1997-2002 पर्यंत पंजाबचे मुख्यमंत्री होते. त्याचवेळी 1972, 1980 आणि 2002 मध्ये विरोधी पक्षनेतेही होते. प्रकाशसिंग बादल हे देखील खासदार राहिले आहेत. त्यांनी केंद्रात मंत्री म्हणूनही काम केले होते. 1 मार्च 2007 ते 2017 पर्यंत त्यांनी दोन वेळा मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली.

Tags

follow us