Download App

सरपंच ते पाचवेळा मुख्यमंत्री, प्रकाश सिंह बादलांचा थक्क करणारा प्रवास

Parkash Singh Badal : पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल (Parkash Singh Badal)यांचे निधन झाले आहे. 95 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांना श्वसनाचा त्रास जाणवत होता. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली आहे.

राजकारणात वर-खाली होतं असतं, पण मी थांबणार नाही, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर

बादल यांनी त्यांच्या राजकीय कार्यकाळात अनेक विक्रम केले आहेत. 1952 मध्ये बादल गावातून निवडून आले, तेव्हा ते सर्वात तरुण सरपंच होते. याशिवाय, ते 1970 मध्ये राज्याचे सर्वात तरुण मुख्यमंत्री (Young Chief Minister)बनले. पण त्याचवेळी ते 2012-17 मध्ये सर्वात वयोवृद्ध मुख्यमंत्रीही बनले.

प्रकाश सिंह बादल यांनी 1957 मध्ये पहिल्यांदा विधानसभा निवडणूक (Assembly Elections) जिंकली होती. त्याचबरोबर 1970 मध्ये 43 वर्षांचे असताना ते पंजाबचे (Punjab)सर्वात तरुण मुख्यमंत्री बनले. प्रकाश सिंह बादल यांनी एकूण पाचवेळा पंजाबचे मुख्यमंत्रिपद भूषविले आहे.

प्रकाश सिंह बादल यांच्या नावावर एक अनोखा विक्रमही आहे. ते एकीकडे पंजाबचे सर्वात तरुण मुख्यमंत्री बनले होते तर दुसरीकडे 2017 मध्ये त्यांनी मुख्यमंत्री म्हणून पाचवा कार्यकाळ पूर्ण केला, त्यावेळी ते सर्वात वयस्कर मुख्यमंत्री होते. त्यावेळी त्यांचे वय 90 वर्ष होते.

ते शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख होते. हा पक्ष नेहमी शिखांच्या प्रतिनिधीत्वासाठी बोलत आला आहे. या पक्षाने अनेकदा भाजपला पाठिंबा दिला आहे. प्रकाश सिंह बादल पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले तेव्हा ते 43 वर्षांचे होते. ते 1967 मध्ये एकदा निवडणूक हरले. त्यानंतर मात्र 1969 पासून आजपर्यंत त्यांनी कधीही निवडणूक हरले नव्हते.

Tags

follow us