Download App

‘गरिबांच्या झोपड्यांमध्ये फोटो सेशन’, पंतप्रधान मोदींनी साधला राहुल गांधींवर निशाणा

Parliament Budget Session 2025 PM Modi Speech : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा (Parliament Budget Session 2025) आज चौथा दिवस आहे. यावेळी पंतप्रधान मोदी (PM Modi) संसदेत बोलत होते. यावेळी पीएम मोदींनी राहुल गांधींचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, गरिबांच्या झोपड्यांमध्ये फोटो सेशन करून जे लोक समोर येतात, त्यांना संसदेत गरिबांबद्दल बोलणे कंटाळवाणे वाटेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावाला उत्तर देण्यास सुरुवात केली आहे. पंतप्रधान मोदींनी देशात केलेल्या विकासकामांचा उल्लेख केलाय. त्यांनी सांगितलं की, गेल्या काही वर्षांत 25 कोटी भारतीय दारिद्र्यरेषेतून बाहेर (PM Modi News) पडलेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आमच्या सरकारने घोषणा दिल्या नाहीत तर खऱ्या अर्थाने गरिबांची सेवा केली. पाच दशके खोट्या घोषणा दिल्या गेल्या. मध्यमवर्गीयांची स्वप्ने समजून घेण्यासाठी उत्कटता लागते.

VIDEO : मला बिर्याणी अन् चिकन फ्राय हवंय, चिमुकल्याच्या विनंतीवर सरकार करतंय अंगणवाडीतील मेनूमध्ये बदल

पंतप्रधान मोदींनी यावेळी राहुल गांधींवर (Rahul Gandhi) हल्लाबोल केलाय. ते म्हणाले की, काही नेत्यांचे लक्ष त्यांच्या घरातील स्टायलिश बाथरूमवर असते. प्रत्येक घरात नळाचे पाणी पोहोचवण्यावर आमचे लक्ष आहे. 12 कोटी लोकांना नळाचे पाणी पुरवले. आमचे लक्ष गरिबांसाठी घरे बांधण्यावर आहे. जे गरीब लोकांच्या झोपड्यांमध्ये फोटो सेशन करतात त्यांना गरिबांबद्दल बोलणे कंटाळवाणे वाटेल. पंतप्रधान मोदी म्हणाले की, जवळपास पाच दशकांपासून गरिबी हटावचे नारे दिले जात होते. आता 25 कोटी गरीब लोक गरिबीतून बाहेर आलेत. मोदी म्हणाले की, आमच्या स्वच्छता मोहिमेची थट्टा करण्यात आली, पण सरकारी कार्यालयांमधून विकल्या जाणाऱ्या रद्दीतून सरकारने 2300 कोटी रुपये कमावले आहेत. महात्मा गांधी विश्वस्त म्हणायचे आणि म्हणायचे की मालमत्ता जनतेची आहे. आम्ही त्यातील प्रत्येक पैसा वाचवण्याचा प्रयत्न करतोय.

Video : अंजलीताई ‘बदनामियांनी’ अनेकांना बदनाम केलं, आता त्यांच्या एपिसोडमध्ये मी; मुंडेंचा पलटवार

इथेनॉल मिश्रणाद्वारे 1 लाख कोटी रुपये शेतकऱ्यांच्या हातात जातील, असं पंतप्रधान मोदी म्हणालेत. तसेच कोणतेही घोटाळे न झाल्यामुळे लाखो कोटी रुपये वाचलेत. ते जनतेसाठी वापरले जात आहेत. उर्वरित लाखो कोटी रुपये आपण काचेचा महाल बांधण्यासाठी वापरले नाहीत, तर देश बांधण्यासाठी वापरलेत. आम्ही येण्यापूर्वी पायाभूत सुविधांचे बजेट 1.8 लाख कोटी रुपये होते. आज ते 11 लाख कोटी रुपये आहे. रस्ते, महामार्ग, रेल्वे आणि ग्रामीण रस्त्यांसाठी विकासाचा मजबूत पाया रचण्यात आलाय. आयुष्मान भारत योजनेमुळे, आजारपणामुळे झालेल्या खर्चामुळे, आतापर्यंत लाभ घेतलेल्यांचे 1 लाख 20 हजार कोटी रुपये वाचवल आहेत. आम्ही जन औषधी केंद्रे उघडली आहेत. तिथे 80 टक्के डिस्काउंट असतो, त्यांचे जवळपास 30 हजार रूपये औषधांचा खर्च वाचलाय.

 

follow us