जगात काँग्रेसची मलीन प्रतिमा स्वच्छ करण्यातच माझा मौल्यवान वेळ खर्ची; राज्यसभेत मोदींनी काढले वाभाडे

Narendra Modi काँग्रेसच्या पंतप्रधानांची जुनी भाषणे ऐका त्यांच्याकडे विचार, दूरदृष्टी आणि इच्छाशक्ती नसल्याचा जोरदार हल्लाबोल मोदींनी केलाय.

जगात काँग्रेसची मलीन प्रतिमा स्वच्छ करण्यातच माझा मौल्यवान वेळ खर्ची; राज्यसभेत मोदींनी काढले वाभाडे

जगात काँग्रेसची मलीन प्रतिमा स्वच्छ करण्यातच माझा मौल्यवान वेळ खर्ची; राज्यसभेत मोदींनी काढले वाभाडे

Parliament Budget Session Narendra Modi Speech : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलण्यास सुरुवात करताच विरोधकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यावेळी मोदींनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, लाल किल्ल्यावरील काँग्रेसच्या पंतप्रधानांची जुनी भाषणे ऐका त्यांच्याकडे विचार, दूरदृष्टी आणि इच्छाशक्ती नव्हती. आज माझा मैल्यवान वेळ जगात काँग्रेसची असलेली मलिन प्रतिमा पुसून टाकण्यासाठी खर्ची होत आहे. आज, प्रमुख देश भारतासोबत व्यापारी संबंध प्रस्थापित करण्यास उत्सुक आहेत. युरोपियन युनियनचा ट्रेल डील असो किंवा अमेरिकेचा व्यापार करार असो, अमेरिकेच्या व्यापार करारानंतर जगाचा विश्वास वाढला आहे.

Narendra Modi : संसदेत मोदींवर हल्ला करण्याचा कट होता… हादरवणारी अपडेट समोर!

खर्गेंना वयावरून लगावला टोला

भाषणाच्या सुरूवातीला मोदींनी विरोध बाकावर बसलेल्या खर्गेंना टोला लगावला. मोदी म्हणाले की, “मी सभापतींना विनंती करतो की, वयोमानानुसार खर्गेजी यांना त्यांच्या आसनावर बसून बोलण्याची आणि घोषणाबाजी करण्याची परवानगी द्यावी. राज्यसभेत मोदींच्या भाषणावेळी  विरोधी पक्षनेते खर्गे आणि इतर विरोधी खासदारांनी “हुकूमशाही चालणार नाही” अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यावेळी मोदींनी आदरणीय खर्गेजींचे वय पाहता ते बसूनही घोषणा देऊ शकतात. कारण येथे तरुण खासदार देखील असल्याचा टोला लगावला.

ऑनलाईन गेमचा नाद अन् तीन सख्या बहिणींची आत्महत्या; कारण ठरलेला कोरियन गेम नक्की काय?

भारत अनेक देशांचा विश्वासू पार्टनर

जर आपण वर्तमानाकडे पाहिले तर भारताला अनेक संधी मिळाल्या आहेत. हा स्वतःमध्ये एक अद्भुत योगायोग आहे. जगातील प्रमुख राष्ट्रे वृद्ध होत आहेत. पण आपला देश विकासाच्या नवीन उंची गाठत आहे. 21 व्या शतकाचा पहिला तिमाही संपला आहे. दुसरा तिमाही महत्त्वाचा असेल. हा दुसरा तिमाही विकसित भारताच्या उभारणीच्या दिशेने जलद प्रगतीचा काळ असेल.  देश आज वेगाने विकास करत असून आज भारत अनेक देशांचा विश्वासू पार्टनर बनला आहे.

जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा देश जगात सहाव्या क्रमांकावर होता, परंतु या लोकांनी (काँग्रेसने) तो दहाव्या क्रमांकावर नेल्याचे मोदी म्हणाले. आज भारत जगाच्या आव्हानांवर उपाय देणारा आणि आशेचा किरण असलेला देश बनला असून, देश वाटचाल आता तिसऱ्या क्रमांकाकडे असल्याचे मोदींनी अधोरेखित केले. अलिकडच्या व्यापार कराराचा संदर्भ देत पंतप्रधान मोदी म्हणाले, “जग आमच्या व्यापार कराराचे कौतुक करत आहे. जागतिक अस्थिरतेबद्दलची चिंता कमी झाली आहे. जागतिक बाजारपेठ देशातील तरुणांसाठी खुली झाली आहे. कोविडनंतर, जागतिक व्यवस्था बदलत आहे. जग भारताकडे आशेने आणि आत्मविश्वासाने पाहत आहे. गुजरातचा मुख्यमंत्री असतानाही व्हायब्रंट गुजरात शिखर परिषदेद्वारे देशाची इच्छाशक्ती दाखवली.

 

Exit mobile version