Download App

Parliament Security : घुसखोरीआधी होता वेगळाच प्लॅन; दिल्ली पोलिसांच्या चौकशीत धक्कादायक माहिती

Parliament Security Breach : संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू असताना थेट संसदेत (Parliament Security Breach) घुसून धुडगूस घालणाऱ्या आणि संसदेबाहेर आंदोलन केल्याप्रकरणात रोज नवनवीन आणि तितकेच धक्कादायक खुलासे होत आहेत. या दोन्ही प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची चौकशी पोलीस करत असून या चौकशीत धक्कादायक माहिती समोर येत आहे. पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) शनिवारी सांगितले की, संसदेत घुसण्याचा प्लॅन तयार करण्याआधी या लोकांचा वेगळाच प्लॅन होता. तो म्हणजे आत्मदहन आणि पॅम्पलेटचे वाटप करणे.

रिपोर्टमध्ये म्हटले आहे, की या प्रकरणात आता भाजप खासदार प्रताप सिम्हा यांचाही जबाब नोंदण्याचा विचार दिल्ली पोलीस करत आहेत. सिम्हा यांच्याच पासवर या आरोपींनी संसदेत प्रवेश मिळवला होता. यातील सागर शर्मा आणि मनोरंजन डी यांनी लोकसभेत उड्या घेतल्या होत्या. तर त्याचवेळी अमोल शिंदे आणि नीलम यांनी संसदेबाहेर आंदोलन केले होते. पाचवा आरोपी ललित झा याने या आंदोलनाचे व्हिडिओ काढून सोशल मीडियावर शेअर केले होते.

Parliament Security Breach प्रकरणाच्या मास्टरमाईंडने केलं सरेंडर; फरार ललित झा पोलिसांच्या ताब्यात

या प्रकरणात आतापर्यंत काय कार्यवाही झाली आहे याची माहिती पोलिसांनी दिली. या योजनेला अंतिम रुप देण्याआधी आरोपींनी असे काही पर्याय शोधले होते ज्याद्वरे सरकारला आपला मेसेज देता येईल. त्यांनी सगळ्यात आधी आपल्या शरीरावर अग्निरोधक जेल लावून आत्मदहन करण्याचा विचार केला होता मात्र नंतर त्यांनी हा विचार सोडून दिला. संसदेत पॅम्पलेट वाटण्याचाही विचार या लोकांनी केला होता. मात्र हाही विचार सोडून देण्यात आला. याआधी शुक्रवारी तपासी अधिकारी आरोपींना विविध ठिकाणी घेऊन गेले ज्या ठिकाणी ते भेटले आणि कट रचला होता.

दिल्ली पोलिसांतील सूत्राने एएनआयल सांगितले की या प्रकारासाठी चारही आरोपींनी सात स्मोक कॅन बरोबर आणले होते. आरोपींनी इंटरनेटच्या माध्यमातून संसदेच्या आसपासच्या भागाची माहिती घेतली होती. सुरक्षित चॅट कशी करता येईल याचाही शोध त्यांनी घेतला होता. दिल्ली पोलिसांच्या सूत्रांकडून अशी माहिती मिळाली आहे की या लोकांचा सर्वात मोठा उद्देश मीडियात चर्चेत येणे हा होता यासाठी त्यांनी संसदेत घुसून गोंधळ घालण्याचा कट रचला.

Parliament Security Breach : अमोलशी बोलणं करून द्या, नाहीतर जीव देईल; अमोल शिंदेच्या वडिलांच्या उद्विग्न भावना

Tags

follow us