Parliament Security Breach : अमोलशी बोलणं करून द्या, नाहीतर जीव देईल; अमोल शिंदेच्या वडिलांच्या उद्विग्न भावना
Parliament Security Breach : पटियाला हाऊस कोर्टाने बुधवारी नवीन संसद भवनातील सुरक्षेचे उल्लंघन केल्याप्रकरणी अटक केलेल्या चार आरोपींना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. आरोपींविरुद्ध UAPA च्या कलम 16A (दहशतवाद कायदा) अंतर्गत गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आता आरोपी अमोल शिंदे (Amol Shinde) यांच्या वडिलांना यावर प्रतिक्रिया दिली आहे. अमोलने जे काही केले ते बेरोजगारीच्या कारणामुळं केलं. आमचं अमोलशी दोन-तीन दिवसांत बोलू, अन्यथा मी आत्महत्या करेन, असा इशारा अमोलचे वडिल धनराज शिंदे यांनी दिला.
भाजप नगरसेवक स्वप्निल शिंदे यांच्यासह सात जणांवर मोक्का!
बुधवारी लोकसभेचे अधिवेशन सुरू असताना दोन व्यक्तींनी (सागर शर्मा, मनोरंजन डी) सुरक्षेला बगल देऊन प्रेक्षक गॅलरीतून सभागृात उड्या मारल्या. त्यांनी सभागृहात स्मोक बॉम्ब टाकून धुर केला. यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. तर त्याच वेळेस एक तरुण आणि तरुणी (अमोल शिदे, नीलम) यांनी बाहेर घोषणाबाजी केली. त्यांनाही ताब्यात घेण्यात आले. म्हैसूरचे भाजप खासदार प्रताप सिन्हा यांच्या व्हिजिटर पासवर तरुणांनी संसदेत प्रवेश केल्याचे समोर आले.
बॉम्बस्फोटातील आरोपींसोबत पार्टी केल्याचा आरोप, बडगुजरांनी केला खुलासा, ‘माझा सलीम कुत्ताशी संबंध…’
दुसरीकडे, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व आरोपी एकमेकांना आधीच ओळखत होते. दरम्यान, त्यांना कोर्टाने पोलीस कोठडी सुनावणी आहे. यावर आता अमोल शिंदेच्या वडिलांनी भाष्य केलं. अमोलने जे काही केले ते बेरोजगारीमुळे केले. सैन्यात भरती होण्यासाठी त्याने सहा ते सात वेळा प्रयत्न केले होते. त्याने धावण्याची स्पर्धाही जिंकली. आमचं २-३ दिवसांत अमोलशी बोलणं करून द्या, नाहीतर मी आत्महत्या करेन असा इशारा त्यांनी दिला.
ते म्हणाले, दिल्लीला जाण्यापूर्वी अमोल विहीर खोदण्याचे काम करायचा. त्या कामाचे त्याला पाच हजार रुपये मिळाले होते. काही पैसे त्याने आपल्या मित्रांकडून उसने घेतले आणि ९ तारखेला तो दिल्लाला गेला. त्याआधी त्याने दोन दिवस मजूरी केली होती. लातूरहून त्याने भगतसिंग यांचा फोटो घेतला होता. आणि भगतसिंगांचा फोटो असलेला टी-शर्ट खरेदी केला. तो घालूनच अमोल दिल्लाला गेला होता. अमोलवर भगतसिंगाच खूप प्रभाव आहे. आम्ही दोघंही नवरा-बायको मजूरी करतो. त्याला गरज असेल तेव्हा आम्ही त्याला पैसे दिले होते. त्याचं शिक्षणही कष्ट करून पूर्ण केलं. मात्र, त्याला नोकरी लागत नव्हती. ज्या राज्यात लष्कराची भरती निघेल, तिथं तो जात होता. पण, त्याला नोकरी लागत नव्हती. ज्या राज्यात लष्कराची भरती निघेल, अमोलने तो घातला आणि दिल्लीला गेला. आम्ही दोघे पती-पत्नी शेतीची कामे करतो. जेव्हा त्याला गरज होती तेव्हा आम्ही त्याला पैसे दिले. त्यांनी आपले शिक्षणही मेहनतीने पूर्ण केले. पण त्याला नोकरीची गरज नव्हती. सैन्य भरती सुरू असलेल्या राज्यात तो जात होता पण त्याल घेत नव्हते, असं वडिल धनराज शिंदे यांनी सांगितलं.