भाजप नगरसेवक स्वप्निल शिंदे यांच्यासह सात जणांवर मोक्का!

भाजप नगरसेवक स्वप्निल शिंदे यांच्यासह सात जणांवर मोक्का!

Ahmednagar News : अहमदनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अंकुश चत्तर (Ankush Chattar) खूनप्रकरणी अटकेत असलेले भाजप नगरसेवक स्वप्निल शिंदे (Swapnil Shinde) यांच्यासह इतर सात जणांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच स्वप्निल शिंदे यांच्यासह इतर सात जणांनी अंकुश चत्तर यांच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. या हल्ल्यात चत्तर यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी अटकेत असतानाच विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या आदेशावरुन आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी प्रसिद्ध केले आहे.

बॉम्बस्फोटातील आरोपींसोबत पार्टी केल्याचा आरोप, बडगुजरांनी केला खुलासा, ‘माझा सलीम कुत्ताशी संबंध…’

यामध्ये स्वप्नील रोहिदास शिंदे (40) अभिजीत रमेश इलाख (३३), सुरज ऊर्फ मिक्वा राजन कांबळे (२५), महेश नारायण कुन्हे (२८), अक्षय प्रल्हादराव हाके (३३), मिथुन सुनिल वोने (२३), राज भास्कर पुलारी (२३) अरुण अशोक पवार (२३) यांच्या विरुध्द मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, या खुनाच्या घटनेनंतर अहमदनगर शहरात एकच खळबळ उडाली होती. अंकुश चत्तर हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एक सक्रिय कार्यकर्ते होते. त्यामुळे घटनेनंतर अहमदनगर शहरात खळबळ उडाली होती.

अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात भाजप आमदार दोषी; तब्बल 25 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

एकविरा चौकात चत्तर यांच्यावर काळ्या रंगाच्या वाहनातून आलेल्या आठ ते दहा जणांनी हल्ला केला. या हल्ल्यामध्ये अंकुश चत्तर गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. सावेडीतील एकविरा चौकात काल (शनिवारी) रात्री उशिरा प्राणघातक हल्ला झाला. मात्र, चत्तर यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी भाजप नगरसेवक स्वप्नील शिंदे यांच्यासह 7 जणांना अटक केली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.

पाईपलाईन रोडवरील एकविरा चौक येथे अंकुश चत्तर यांच्यावर (ता. १५) रोजी रात्री उशिरा प्राणघातक हल्ला झाला होता. काळ्या रंगाच्या वाहनातून आलेल्या आठ ते दहा जणांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. यात चत्तर गंभीर जखमी झाले त्यांना उपचारासाठी तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. दुर्दैवाने त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली असून त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

कुणी 70 कोटी तर कुणी 4 लाख; ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटासाठी कलाकरांनी घेतलं एवढं मानधन

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube