Sanjay Raut : संसदेतील घटनेनं सरकार बधीर, सुरक्षेच्या नावाने.. राऊतांचा घणाघात
Sanjay Raut on Parliament Security Breach : संसदेच्या सुरक्षा भंग प्रकरणात एक नवीन अपडेट समोर आले आहे. संसद सुरक्षा भंग प्रकरणात (Parliament Security Breach) एकूण 6 जणांचा सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी (police) चार जणांना ताब्यात घेतले आहे. तर दोघांचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. या घटनेवर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया सुरू असून विरोधी पक्षांनी टीकेची झोड उठविली आहे. आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही मोदी सरकारला घेरले आहे. आताची वास्तू संसदभवन वाटतच नाही. संसदेची इमारत माझ्या दृष्टीने जास्त असुरक्षित आहे, असे राऊत यांनी म्हटले. (Shiv Sena MP Sanjay Raut Criticized Modi Government on Parliament Security Breach Incident)
नवी संसद माझ्या दृष्टीने अधिक असुरक्षित आहे. जुनी संसद जास्त सुरक्षित होती. संसदेत जात आहोत असं आपल्याला वाटायला हवं तसा अनुभव या नव्या संसदेत जाताना येत नाही. सुरक्षेच्या नावाने सगळीच बोंब आहे. कालच्या संसदेतील प्रकाराने तर सरकारची वाचाच गेली आहे. सरकार मूकं आणि बधीर झालं आहे. निवडणूक आणि शपथविधीत व्यस्त आहे. आता जनतेच्या लक्षात आलं असेल की हे सरकार किती तकलादू पायावर उभं आहे. आता लोकांच्या लक्षात आलं असेल की जम्मू काश्मीर, लद्दाखमध्ये अतिरेकी कसे घुसतात.
Parliament Security : कारवाईचा बडगा! संसदेची सुरक्षा भेदणाऱ्यांवर UAPA अंतर्गत गुन्हा दाखल
काल ज्या तरुणांना पकडलं गेलं. त्यांचा मार्ग चुकीचा. पण त्यांनी मांडलेल्या भावना या देशाच्या भावना होत्या. त्यांना वडे तळायलाही जागा नाही. त्यातील एक मुलगी पीएचडी करत आहे. तिला अजित पवार यांनी मार्गदर्शन करावं असा टोला राऊत यांनी लगावला.
काय घडली घटना ?
खासदार अरविंद सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकसभेत शून्य प्रहाराचे कामकाज सुरु होते. अचानक प्रेक्षक गॅलरीतून तिघे जण खांबाला धरुन लटकले. त्यातील दोन जणांनी खाली उडी घेतली आणि ते लोकसभेतील बाकांवर इकडून तिकडे पळत होते. त्याचवेळी तिसऱ्या व्यक्तीने बुटातून काही तरी गॅसचा फवारा केला. यामुळे उपस्थित खासदारांच्या नाकात आणि डोळ्यात जळजळ सुरु झाली. त्यानंतर सभागृह तहकूब झाले. सुरक्षा रक्षकांनी या तिघांनाही ताब्यात घेतले असून ते जे काही पुढील कारवाई असेल ते करत आहेत. पण या तिघांनी कोणत्याही घोषणा दिल्या नाहीत किंवा आरडाओरड केली नाही. त्यामुळे ते नेमके कशासाठी आले होते याचा अंदाज लागू शकलेला नाही, असेही सावंत म्हणाले.