Download App

Parliament Security Breach प्रकरणाच्या मास्टरमाईंडने केलं सरेंडर; फरार ललित झा पोलिसांच्या ताब्यात

  • Written By: Last Updated:

Parliament Security Breach : संसदेच्या सुरक्षा भंग प्रकरणात (Parliament Security Breach) एक नवीन अपडेट समोर आली आहे. संसद सुरक्षा भंग प्रकरणाचा मास्टरमाईंड ललित झा याने गुरूवारी रात्री पोलिसांपुढे सरेंडर केलं. आता या प्रकरणी त्याची सखोल चौकशी सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

ललित हाच घटनेचा मास्टरमाईंड असल्याचे उघड…

संसदेच्या सुरक्षा भंग प्रकरणं झालं तेव्हाच ललितने फरार झाला होता. मात्र ललित हाच या घटनेचा मास्टरमाईंड असल्याचे उघड झाल्यानंतर त्याचा तपास सुरू होता. सुरूवातीला पोलिसांनी पाच आरोपींना ताब्यात देखील घेतले होते. मात्र ललितचा ठाव ठिकाणा लागत नव्हता. तो राजस्थानात असल्याची माहीती मिळाली होती. मात्र अखेर गुरूवारी रात्री पोलिसांपुढे सरेंडर केलं. मात्र तो कोणत्याही संघटनेशी संबंधित असल्याचे कोणतेही पुरावे मिळालेले नाही.

Ole Aale Movie: सायली अन् सिद्धार्थच्या मनातले ‘फुलपाखरू’; ‘या’ दिवशी होणार रिलीज

असा आखला कट..

हे सगळे मुख्य आरोपी आणि इतर सर्व जण दिड वर्षापूर्वी हे सर्व जण म्हैसूरमध्ये भेटले होते. सोशल मिडीयावर भगत सिंह फॅन क्लब नावाच्या ग्रुपवर एकमेकांशी जोडलेले होते. तर सागर आणि मनोरंजन यांनी संसदेत जाण्याचे पास मिळवले होते. जुलैमध्येच सागने संसदेत जाण्याची योजना बनवली होती. पण ते पास मिळवू शकले नाही. तसेच 10 डिसेंबरला त्यांनी इंडिया गेट जवळ भेटून ज्या स्मोक बॉम्बचा संसदेत वापर केला ते एकमेकांना दिले होते. तर गुप्त पद्धतीने ते फटाके संसदेत नेले गेले.

Sanjay Raut : ‘भाजपाच्या जावयाला मुंबई गिळायचीय’; अदानींविरोधात रस्त्यावर उतरण्याचा राऊतांचा इशारा

दरम्यान बुधवारी नवीन संसद भवनात सुरक्षा भंग (Parliament security breach) केल्याप्रकरणी अटक करण्यात असलेल्या चार आरोपींना पटियाला हाऊस कोर्टाने सात दिवसांची पोलीस कोठडी (Police custody) सुनावली आहे. दिल्ली पोलिसांचे सहाय्यक सरकारी वकील अतुल श्रीवास्तव यांनी न्यायालयात सांगितले की, आरोपींविरुद्ध UAPA च्या कलम 16A (दहशतवाद कायदा) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय आरोपींना लखनौ आणि मुंबईला चौकशीसाठी न्यावे लागणार आहे. ते शूज लखनौहून आणले होते, तर कलर स्मॉग मुंबईहून आणले होते, अशी माहिती त्यांनी दिली.

Tags

follow us