Download App

Parliament Session: संसदेचा पहिला दिवस विरोधक गाजवणार? 10 दिवसांत काय काय होणार?

अठराव्या लोकसभेचे पहिले अधिवेशन सोमवारपासून (24 जून) सुरू होत आहे. हे अधिवेशन 3 जुलैपर्यंत चालणार आहे.

  • Written By: Last Updated:

Parliament Session: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर आता अठराव्या लोकसभेचे पहिले अधिवेशन सोमवारपासून (24 जून) सुरू होत आहे. हे अधिवेशन 3 जुलैपर्यंत चालणार आहे. दरम्यान, संसद अधिवेशनाच्या या दहा दिवसात काय काय होणार आहे? याच विषयी जाणून घेऊ.

Pune Drugs : अधिकाऱ्यांकडून मंत्री शंभूराज देसाईंना हप्ता जातो; आमदार धंगेकरांचा गंभीर आरोप

10 दिवसात संसदेत काय होणार?
1. पंतप्रधान मोदी संसदेला संबोधित करणार आहेत
2. लोकसभा अध्यक्षांची निवडणूक
3. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे अभिभाषण
4. पंतप्रधान मोदी मंत्रिमंडळातील सदस्यांची ओळख करून देणार
5. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर चर्चा

संसदेच्या दहा दिवसांच्या अधिवेशनात एकूण आठ बैठका होतील. पहिल्या दिवशी सर्वप्रथम प्रोटेम स्पीकर म्हणून भर्तृहरी महताब राष्ट्रपती भवनात जाऊन शपथ घेतील. यानंतर ते सकाळी 11 वाजता लोकसभेत पोहोचतील. 11 वाजता संसदेचं कामकाज सुरू होईल. यानंतर 24 ते 25 जून रोजी प्रोटेम स्पीकर नवीन खासदारांना शपथ देतील.

पारंपारिक रीतिरिवाजांनी संपन्न होणार रमाची पहिली वटपौर्णिमा; रंगणार फुगड्यांची स्पर्धा 

तुरुंगातील दोन खासदारही घेणार शपथ
सध्या तुरुंगात असलेले दोन खासदारही सभागृहात शपथ घेणार आहेत. यामध्ये एक अमृतपाल सिंग आणि दुसऱ्या राशीद इंजिनियर यांचा समावेश आहे. पंजाबमधील खडू साहिब मतदारसंघातून अमृतपाल सिंग यांनी काँग्रेसच्या कुलबीर सिंग जीरा यांचा पराभव करत विजय मिळवला आहे. तर रशीद इंजिनियर यांनी जम्मू-काश्मीर नॅशनल कॉंफ्रेसच्या ओमर अब्दुल्ला यांचा २ लाखांहून अधिक मतांनी पराभव केला होता. राशिद यांनी बारामुल्ला मतदारसंघातून निवडणूक लढवली आहे.

खासदारांचा शपथविधी झाल्यानंतर 26 जून रोजी लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे.

दरम्यान, राज्यसभेचे 264 वे अधिवेशन 27 जूनपासून सुरू होणार असून त्याच दिवशी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूही दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करणार आहेत. राष्ट्रपतींनंतर पीएम मोदी त्यांचे भाषण करतील. अधिवेशनाच्या शेवटच्या दोन दिवसांत सरकार राष्ट्रपती मुर्मू यांच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्ताव आणणार आहे. यानंतर दोन्ही सभागृहात चर्चा होईल.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 जुलै रोजी, लोकसभेला संबोधित करणार आहेत

पहिल्याच दिवशी गोंधळाची शक्यता…
10 वर्षांनंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना तीव्र विरोधाचा सामना करावा लागणार आहे. 18व्या लोकसभेच्या पहिल्या सत्रात प्रोटेम स्पीकरवरून विरोधक गोंधळ घालू शकतात.
याशिवाय, गेल्या आठवड्यात झालेल्या NEET परीक्षेतील गैरप्रकार, तीन फौजदारी कायदे आणि लोकसभा निवडणुकीनंतर शेअर बाजारातील अनियमितता या आरोपांमुळे सरकारची कोंडी होऊ शकते.

 

follow us

वेब स्टोरीज