मोठी बातमी! केंद्र सरकारने बोलावले 5 दिवसांचे विशेष अधिवेशन, मोदी कोणती खेळी खेळणार?

Parliment Special Session : संसदेचं पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर लगेचच संसदेचं पाच दिवसांचे विशेष अधिवेशन (Parliment Special Session) बोलावण्यात आले आहे. या अधिवेशनाचा कालावधी 18 ते 22 सप्टेंबर ठेवण्यात आला आहे. अधिवेशनाची अचानक घोषणा झाल्याने या पाच दिवसांत मोदी सरकार (PM Modi) कोणता मास्टरस्ट्रोक खेळणार याची चर्चा सुरू झाली आहे. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी […]

Untitled Design (17)

Parliment Special Session

Parliment Special Session : संसदेचं पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर लगेचच संसदेचं पाच दिवसांचे विशेष अधिवेशन (Parliment Special Session) बोलावण्यात आले आहे. या अधिवेशनाचा कालावधी 18 ते 22 सप्टेंबर ठेवण्यात आला आहे. अधिवेशनाची अचानक घोषणा झाल्याने या पाच दिवसांत मोदी सरकार (PM Modi) कोणता मास्टरस्ट्रोक खेळणार याची चर्चा सुरू झाली आहे.

संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ट्विट करत यासंदर्भातली माहिती दिली. त्यांनी ट्विटरवर पोस्ट करत म्हटलं की, संसदेचे विशेष अधिवेशन 18 ते 22 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. .

17व्या लोकसभेच्या 13व्या अधिवेशनासाठी आणि राज्यसभेच्या 261व्या अधिवेशनासाठी 18 ते 22 सप्टेंबर दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. पाच बैठका होणार आहेत. अमृत कालच्या वेळी संसदेत फलदायी चर्चा आणि चर्चा अपेक्षित आहे, प्रल्हाद जोशी यांनी म्हटले आहे.

संविधानाच्या कलम 85 मध्ये संसदेचे अधिवेशन बोलविण्याची तरतूद आहे. या अंतर्गत सरकारला संसदेचे अधिवेशन बोलवण्याचा अधिकार आहे. संसदीय कामकाजावरील कॅबिनेट समिती निर्णय घेते. याला राष्ट्रपतींची संमती असते. याद्वारे खासदारांना अधिवेशनात बोलावले जाते.

संसदेचं पावसाळी अधिवेशन हे 20 जुलै ते 11 ऑगस्टपर्यंत चाललं होतं. मणिपूर हिंसाचारामुळे संसदेचे हे गदारोळात पार पडले होते. लोकसभा आणि राज्यसभेत विरोधकांच्या गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज अनेकदा तहकूब करावे लागले होते. पंतप्रधान मोदींनी मणिपूरमधील हिंसाचारासंदर्भात उत्तर द्यावं, यासाठी विरोधकांना मोदरी सरकारवर अविश्वास प्रस्ताव आणला होता.

Babar Azam चा भारताविरुद्ध वनडेतील लाजिरवाना विक्रम; सहा वर्षांमध्ये एकही अर्धशतक नाही 

दरम्यान, सूत्रांना दिलेल्या माहितीनुसार, या विशेष अधिवेशनात दहाहून अधिक महत्वाची विधेयकं मांडली जाणार आहेत. विधेयकामुळं हे विशेष अधिवेशन बोलालवण्यात येत असल्याची माहिती आहे. मात्र, हिवाळी अधिवेशनापूर्वीच अचानक संसदेचं पाच दिवसांचे विशेष सत्र बोलावल्यानं आश्चर्य व्यक्त होतं आहे.

Exit mobile version