Babar Azam चा भारताविरुद्ध वनडेतील लाजिरवाणा विक्रम; सहा वर्षांमध्ये एकही अर्धशतक नाही
Babar Azam record vs India : आशिया कप 2023 मध्ये टीम इंडिया (Team india)आणि पाकिस्तान टीममध्ये येत्या 2 सप्टेंबरला महामुकाबला रंगणार आहे. क्रिकेटप्रेमी या सामन्याची आतुरतेने वाट पाहात आहेत. आशिय कप स्पर्धेमधील टीम इंडियाचा हा पहिला तर पाकिस्तानचा दुसरा सामना असणार आहे. तब्बल दहा महिन्यानंतर टीम इंडिया आणि पाकिस्तान आमनेसामने येणार आहेत. 2022 मध्ये टी-20 विश्वचषकात दोघांमध्ये लढत झाली होती. मात्र, यावेळी रोहित शर्मा आणि बाबर आझमचा संघ वनडे (Babar Azam)फॉरमॅटमध्ये एकमेकांविरुद्ध भिडणार आहे.
पुणे, पिंपरी-चिंचवडच्या माजी नगरसेवकांच्या डोक्याची मंडई; म्हणतात, लोकसभेनंतर बघू…
या सामन्यात सर्वांच्या नजरा बाबर आझमच्या खेळीकडे लागल्या आहेत. सध्याच्या आशिया चषक स्पर्धेतील पहिल्या सामन्यात त्याने नेपाळविरुद्ध 151 धावांची खेळी करुन इतर संघांना इशारा दिला आहे. बाबर भलेही चांगल्या फॉर्ममध्ये असेल, पण त्याने एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताविरुद्ध कधीही फलंदाजी केलेली नाही.
ठाकरे पवारांच्या पुढाकारातून ग्रँड हयातमध्ये ‘इंडिया’ ची खलबतं; पण खर्चाचे आकडे बघून चक्रावेल डोकं
टीम इंडिया आणि टीम पाकिस्तान चार वर्षांनंतर एकदिवसीय सामन्यामध्ये आमनेसामने येणार आहेत. मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड येथे 2019 च्या विश्वचषकात दोघांची शेवटची भेट झाली होती. त्या सामन्यात बाबर आझमही खेळला होता. कुलदीप यादवच्या शानदार चेंडूवर तो 48 धावांवर बाद झाला. बाबरने भारताविरुद्ध आत्तापर्यंत पाच वनडे सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याला एकही शतक किंवा अर्धशतक झळकवता आलेले नाही.
बाबरने एकदिवसीय क्रिकेटमध्ये एकूण 104 सामने खेळले आहेत. या कालावधीत 59.47 च्या सरासरीने 5353 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर 19 शतकं आहेत. वनडेमध्ये उत्कृष्ट रेकॉर्ड असूनही टीम इंडियाविरुद्धच्या सामन्यांमध्ये तो नेहमीच संघर्ष करावा लागला आहे.
बाबरने भारताविरुद्धच्या पाच सामन्यांच्या पाच डावात केवळ 158 धावा केल्या आहेत. त्याची सरासरीही 40 पेक्षा कमी आहे. पाकिस्तानी कर्णधाराने 31.60 च्या सरासरीने आणि 75.96 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत.
भारताविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात बाबरची खेळी
वर्ष – स्पर्धेचे ठिकाण –रन
2017 – चॅम्पियन्स ट्रॉफी – बर्मिंगहॅम – 8
2017 – चॅम्पियन्स ट्रॉफी – ओव्हल – 46
2018 – आशिया कप – दुबई – 47
2018 – आशिया कप – दुबई – 9
2019 – विश्वचषक – मँचेस्टर – 48
उमेश यादव, केदार जाधव आणि कुलदीप यादव (दोनदा) यांच्या चेंडूवर बाबर भारताविरुद्ध बाद झाला आहे. तोही एकदा धावबाद झाला आहे. अशा स्थितीत त्याचा विक्रम पाहिला तर त्याला भारतीय फिरकीपटू आणि विशेषत: कुलदीप यादवसमोर खूप संघर्ष करावा लागतो.