BSNL Network Update : खाजगी मोबाईल नेटवर्क कंपन्यांनी मोबाईल रिचार्जचे दर वाढवल्याने ग्राहक वर्गातून प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे. महिन्याच्या सुरुवातीस रिचार्ज दरांमध्ये भरमसाठ वाढ करण्यात आली. (Network) याचा थेट परिणाम मोबाईल वापरकर्त्यांवर झाला आहे. यासाठी पर्याय म्हणून मोबाईल वापरकर्त्यांनी आपले मोबाईल नेटवर्क अन्य स्वस्त नेटवर्कमध्ये स्विच करण्याचं प्रमाण वाढवलं आहे.
वायनाड दुर्घटनेनंतर तिसरीतील विद्यार्थ्याचे पत्र होतेय व्हायरल; INDIAN ARMY ने केलं ट्वीटवर पोस्ट
या सर्व बाबी लक्षात घेता बीएसएनएलने 5G नेटवर्कच्या स्पर्धेमध्ये आता प्रवेश केला आहे. बीएसएनएल 4G नेटवर्क देत आहे. काही ग्राहकांनी मोबाईल रिचार्जमध्ये झालेल्या दरवाढीनंतर बीएसएनएल मध्ये कार्ड पोर्ट करून घेतलं. पण ज्या ग्राहकांना 5G नेटवर्क पाहिजे असल्याने काही ग्राहकांनी आहे त्या खाजगी नेटवर्कमध्येच समाधान मानलं आहे किंवा मानाव लागत आहे.
पुण्यात रात्रभर संततधार, नाशकात कोसळ धार, विदर्भात जोरधार; या जिल्ह्यांना रेड अलर्ट
भारतातील दूरसंचार क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण बदल घडत आहे. सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL लवकरच भारतात 5G सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे. BSNL देशभरातील विविध शहरांमध्ये 5G सेवा परीक्षणाच्या अंतिम टप्प्यात आहे. केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी या 5g नेटवर्कची यशस्वी चाचणी केली. त्यांनी बीएसएनएल 5g नेटवर्क वापरून व्हिडिओ कॉलवर संवाद साधला. सिंधिया यांनी x वर व्हिडिओ शेअर केला आहे.