Oil Price Outlook : यावर्षी किंवा 2026 च्या अखेरीस कच्च्या तेलाच्या किमती कमी होतील हा अमेरिकन बँकेचा अंदाज खरा ठरला तर भारताला स्वस्त दरात कच्चे तेल मिळेल आणि पेट्रोल आणि डिझेलच्या किमती (Oil) कमी होऊन सर्वसामान्यांना दिलासा मिळेल. सध्या आखाती देशांमध्ये कच्च्या तेलाची किंमत 71 डॉलरवर आली आहे. दुसरीकडे, अमेरिकन कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल 67 डॉलरवर आहेत. चालू वर्षात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे.
देशात दंगली पेटवून २०२९ च्या निवडणुकीला सामोरे जायचं; नागपूर हिंसाचारावरून राऊतांचा थेट घाव
दुसरीकडे, कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण होऊनही भारतातील अनेक राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती 100 रुपयांच्या पुढे आहेत. जर आपण शहरांबद्दल बोललो तर दिल्ली वगळता कोलकाता, मुंबई आणि चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर 100 रुपये प्रति लिटर आहे. हे दर कच्च्या तेलाच्या किमतीनुसार खूप जास्त आहेत. अमेरिकन इन्व्हेस्टमेंट बँकेने कोणत्या प्रकारचे अंदाज वर्तवले आहेत आणि देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींवर काय परिणाम होऊ शकतो ते पाहूयात.
अमेरिकन गुंतवणूक बँक गोल्डमन सॅक्सने नुकतीच एक नोट प्रसिद्ध केली आहे. या नोटमध्ये, तेलाच्या मागणीत मंद वाढ होण्याची शक्यता. तसेच बँकेने ब्रेंट आणि WTI कच्च्या तेलाच्या किमतींचा अंदाज कमी केला आहे. बँकेने 2026 चा सरासरी ब्रेंट अंदाज $73 वरून $68 आणि WTI $68 वरून $64 वर कमी केला.
भारतात पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होणार?
भारतीय कमोडिटी तज्ञांचे म्हणणे आहे की, चालू वर्षात कच्च्या तेलाच्या किमती याच पातळीवर राहण्याची शक्यता आहे. कच्च्या तेलाची सर्वात जास्त आयात करणारा भारत हा जगातील दुसरा मोठा देश असल्याचे या तज्ज्ञांनी सांगितले. किंमती वाढल्या तर त्याचा परिणाम भारतात महागाईच्या रूपात दिसून येतो.
जर गोल्डमनचा अंदाज खरा ठरला, तर 2026 पर्यंत भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 10 रुपयांची कपात होऊ शकते. म्हणजेच देशाची राजधानी मुंबईत पेट्रोलचा दर 84 ते 85 रुपये आणि डिझेलचा दर 77 ते 78 रुपये प्रति लिटरवर येऊ शकतो. असे झाल्यास देशातील महागाईचे आकडे आणखी कमी होऊ शकतात.