MOIL लिमिटेडमध्ये नोकरीची संधी! एकूण 21 पदांची भरती, ‘या’ तारखेपर्यंत करता येईल अर्ज

MOIL लिमिटेडमध्ये नोकरीची संधी! एकूण 21 पदांची भरती, ‘या’ तारखेपर्यंत करता येईल अर्ज

Recruitment for Various Vacancies MOIL Limited : आजचे युग हे प्रचंड स्पर्धेचे युग असून या स्पर्धेच्या युगात नोकरी मिळवणे हे तरुणांसमोर मोठे आव्हान आहे. कारण बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक तरुण नोकऱ्या मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. दरम्यान तुम्ही बेरोजगार असाल आणि नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. MOIL लिमिटेड नागपूर अंतर्गत पदवीधर प्रशिक्षणार्थी आणि व्यवस्थापक (सर्वेक्षण) या पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना त्यांचे अर्ज https://www.moil.nic.in/ या वेबसाइटद्वारे ऑनलाइन सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. (Recruitment of various vacancies under MOIL Limited Last date 13 august)

MOIL Nagpur ने प्रकाशित केलेल्या जुलै 2023 च्या जाहिरातीनुसार, ही भरती एकूण 21 पदांसाठी केली जाणार आहे. भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण आणि अर्जाची अंतिम तारीख याबद्दल तपशीलवार माहिती जाणून घेऊ.

पदाचे नाव – पदवीधर प्रशिक्षणार्थी आणि व्यवस्थापक (सर्वेक्षण).

पदांचा तपशील-
पदवीधर प्रशिक्षणार्थी (खाणी) – 15 पदे
पदवीधर प्रशिक्षणार्थी (यांत्रिकी) – 04 पदे
व्यवस्थापक – 02 पदे

एकूण रिक्त पदे – 21

नोकरी ठिकाण – नागपूर.

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन.

सोन्याच्या दुकानाचं उद्घाटन अन् अजितदादा संजय काकडे झाले जिगरी दोस्त! 

अटी –
या भरतीकरत अर्ज उमदेवारांनी ऑनलाईन पध्दतीने करायचा आहे. इतर कोणत्याही मार्गांनी अर्ज स्वीकारला जाणार नाही. अर्जाची फी फक्त ऑनलाईन पध्दतीने भरली जाईल. अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. अन्यथा अर्जात काही त्रुटी राहिल्यासअर्ज बाद करण्यात येईल.

अर्ज सुरू होण्याची तारीख – 22 जुलै 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 ऑगस्ट 2023
अधिकृत वेबसाइट – http://moil.nic.in/
जाहिरात –
https://drive.google.com/file/d/1jyIhdo12tV5Rb5Xp-AzSE00d8XZyw4AS/view

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube