VIDEO : अमेरिकन एअरलाइन्सच्या विमानाला आग! विमानात 6 क्रू मेंबर्ससह 178 प्रवासी अडकले, भयंकर परिस्थिती

Denver International Airport Fire Broke Out : अमेरिकेतील डेन्व्हर आंतरराष्ट्रीय विमानतळावर (American Airlines) आज संध्याकाळी अमेरिकन एअरलाइन्स फ्लाइट 1006 च्या इंजिनला आग लागली. विमान डॅलस फोर्ट वर्थ आंतरराष्ट्रीय विमानतळावर उड्डाण करणार होते, परंतु इंजिनमध्ये समस्या आल्यामुळे ते डेन्व्हरकडे वळवण्यात (Denver International Airport) आले. विमान सुरक्षितपणे उतरले, परंतु गेट C-38 वर पार्क केल्यानंतर इंजिनमधून धूर येऊ लागला, ज्यामुळे प्रवाशांना ताबडतोब बाहेर काढण्यात आलं.
…अखेर दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ठरला! भारताच्या ऑलराऊंडरला मिळाली मोठी जबाबदारी
विमानतळ अधिकाऱ्यांनी आणि अमेरिकन एअरलाइन्सच्या निवेदनांनुसार, (America) विमान उतरल्यानंतर डांबरी मार्गावर दाट काळा धूर येऊ लागला. घटनेच्या वेळी विमानात 172 प्रवासी आणि सहा क्रू मेंबर्स होते. सर्वांना ताबडतोब विमानातून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं आणि टर्मिनलवर नेण्यात आलंय.
वोट जिहाद प्रकरण, मुफ्ती इस्माईल सभागृहात भडकले, किरीट सोमय्यांवर हल्लाबोल
अमेरिकन एअरलाइन्सच्या निवेदनात म्हटलंय की, या घटनेत सर्व प्रवाशांची आणि क्रू सदस्यांची सुरक्षितता सुनिश्चित केली. त्यासाठी आम्ही आमच्या क्रू मेंबर्स, डेन्व्हर आंतरराष्ट्रीय विमानतळ टीम आणि बचाव पथकाचे वेळेवर कारवाई केल्याबद्दल आभार मानतो. फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन (FAA) नुसार, अमेरिकन एअरलाइन्स फ्लाइट 1006 हे कोलोरॅडो स्प्रिंग्सहून डॅलस फोर्ट वर्थ आंतरराष्ट्रीय विमानतळावर उड्डाण करणार होते, परंतु इंजिनमध्ये समस्या आल्यामुळे ते डेन्व्हर विमानतळावर वळवण्यात आले.
🚨 BREAKING: American Airlines Plane Erupts in Flames at Denver Airport—Passengers Evacuate in Chaos
This isn’t normal.
🔥 An American Airlines plane just caught fire at Denver International Airport.
🔥 Passengers were forced to evacuate onto the wing as flames and thick smoke… pic.twitter.com/VWkUm1B1rn
— Brian Allen (@allenanalysis) March 14, 2025
छायाचित्रांमध्ये काही प्रवासी विमानाच्या पंखावर उभे असताना दिसत आहे. तर उड्डाणाभोवती धूर पसरलेला दिसत होता. परंतु, कोणत्याही प्रवाशाला किंवा क्रू मेंबरला दुखापत झाली नाही. विमानतळ अधिकाऱ्यांनी तातडीने आग विझवली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेनंतर विमानाच्या तांत्रिक कारणांची चौकशी केली जाईल. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी या घटनेचा संपूर्ण आढावा घेतला जात असल्याचं एअरलाइनने म्हटलंय.