Download App

आदित्य आणि उद्धव ठाकरेंचा संसदेतील शिवसेना कार्यालयातील फोटो चोरीला, राऊतांचं लोकसभा अध्यक्षांना पत्र

  • Written By: Last Updated:

निवडणूक आयोगानं (Election Commission)शिवसेना (Shivsena)हे पक्षनाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्यानंतर संसदेतील शिवसेना कार्यालय (Shiv Sena Office in Parliament)देखील शिंदे गटाला (Shinde Group)देण्यात आलं. आता शिदे गटाकडं हे कार्यालय आल्यानंतर त्याचा चेहरामोहराचं बदलल्याचा पाहायला मिळतोय. या कार्यालयातून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे फोटो काढून टाकले आहेत.

संसदेच्या शिवसेना कार्यालयातील उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्या फोटोऐवजी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांचे फोटो लावण्यात आले आहेत. त्यावर ठाकरे गटाकडून नवीन चाल खेळली आहे.

हेही वाचा : रामदास आठवलेंच्‍या पक्षाला नागालँडमध्ये यश; RPI चे 2 उमेदवार विजयी

फोटो चोरीला गेल्याची तक्रार

ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिलं आहे. आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा फोटो शिवसेना संसदीय पक्षाच्या कार्यालयातून चोरीला गेला, असा दावा त्यात करण्यात आला आहे.  उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो फेब्रुवारी 2023 मध्ये चोरीला गेल्याचं त्यांनी पत्रात म्हटलं आहे. याकडे लक्ष द्यावं आणि फोटो पुनर्प्राप्त करुन कार्यालयात त्याच ठिकाणी ठेवा, अशी विनंती त्यांनी लोकसभा अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात केली आहे.

पत्रात काय लिहले आहे?

सर,

शिवसेना संसदीय पक्षाचे कार्यालय 128, 3रा मजला, संसद भवन, नवी दिल्ली येथे आहे हे तुम्हाला माहिती आहेच. लोकसभा सचिवालयाने हे कार्यालय शिवसेना संसदीय पक्षाला लोकसभा आणि राज्यसभेत काम करण्यासाठी कार्यालय म्हणून दिले आहे.

महोदय, मी तुमच्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की आमच्या संसदीय पक्ष कार्यालयात (128, संसद भवन), शिवसेना संस्थापक आणि प्रमुख हिंदुहृदयसम्राट श्री बाळासाहेब ठाकरे, आदरणीय पक्षप्रमुख श्री उद्धवजी ठाकरे आणि युवासेना प्रमुख श्री आदित्य ठाकरे जी यांना प्रदर्शित केले होते. ज्यामध्ये पक्षप्रमुख श्री उद्धवजी ठाकरे आणि युवा ठाकरे यांचे फोटो फेब्रुवारी 2023 मध्ये चोरीला गेले आहेत. त्यामुळे आपणास विनंती आहे की, त्याकडे लक्ष द्यावे, आणि फोटो पुनर्प्राप्त करून कार्यालयात त्याच ठिकाणी ठेवा.

धन्यवाद

विनायक राऊत

https://www.youtube.com/watch?v=BERIduaZOvg

Tags

follow us