रामदास आठवलेंच्या पक्षाला नागालँडमध्ये यश; RPI चे 2 उमेदवार विजयी
नागालँड : महाराष्ट्रात कसबा पेठ आणि चिंचवडच्या पोटनिवडणूकांची चर्चा सुरू असताना इशान्येकडील राज्यांमधील निवडणूकांचा निकाल हाती येणे सुरू झाले आहे. नागालँड विधानसभा निवडणुकीत (Nagaland Assembly Elections छोट्या पक्षांनीही आपलं अस्तित्व दाखवून दिले आहे. या निवडणूकीत पहिल्यांदाच केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Union Minister Ramdas Athawale) यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) ने बाजी मारली आहे. नागालँडमध्ये आठवलेंच्या आरपीआयचे दोन आमदार निवडून आले आहेत. पहिल्यांदाच राज्याबाहेर आठवले गटाचे आमदार निवडून आले आहेत.
नागालँड विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप, नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी (NDPP) युती आणि नागा पीपल्स फ्रंट यांच्या महत्त्वाची लढत असली तरी अनेक पक्षांनी यश मिळवले आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, भाजप-एनडीपीपी युतीने 32 जागांवर आघाडी घेतली असून, 60 पैकी 2 जागा जिंकल्या आहेत. नागालँडमध्ये युती सरकार सत्तेत येण्याचे चित्र दिसत आहे. NDPP 1 जागा जिंकून 25 जागांवर आघाडीवर आहे, भाजपने 2 जागा जिंकल्या आहेत आणि 12 जागांवर आघाडीवर आहे आणि लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) 3 जागांवर आघाडीवर आहे.
दरम्यान, नागालँडमध्ये भाजप-एनडीपीपी युतीला सुरुवातीच्या कलांमध्ये आघाडी मिळताना दिसत आहे. त्याचवेळी रामदास आठवले यांच्या आरपीआय पक्षाने दोन जागांवर विजय मिळवला आहे. महाराष्ट्राच्या बाहेर देखील आठवले यांच्या आरपीआय पक्षाचे दोन उमेदवार विजयी झाले, ही आठवले यांच्यासाठी गोष्ट असल्याचे बोलले जात आहे. मात्र, अद्याप आठवलेंनी राज्यात आपल्या पक्षाचा एकही आमदार निवडून आणता आला नाही.
Adani Group : सर्वोच्च न्यायालय करणार हिंडेनबर्गच्या आरोपांची चौकशी, अदानी म्हणतात, “सत्याचा विजय…”