Adani Group : सर्वोच्च न्यायालय करणार हिंडेनबर्गच्या आरोपांची चौकशी, अदानी म्हणतात, “सत्याचा विजय…”

  • Written By: Published:
Adani Group : सर्वोच्च न्यायालय करणार हिंडेनबर्गच्या आरोपांची चौकशी, अदानी म्हणतात, “सत्याचा विजय…”

मागील एक महिन्याभरापासून देशभरात सर्वाधिक चर्चेचा विषय ठरलेल्या अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणावर अखेर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. गुंतवणूकदारांच्या संरक्षणासाठी हिंडेनबर्गच्या (Hindenburg Report) आरोपांची चौकशी करण्याची गरज असल्याचं सांगत न्यायालयाने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. अदाणी समुहाविरोधात हिंडनबर्गच्या अहवालाशी संबंधित 4 याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या होत्या. या याचिकांच्या सुनावणीवर न्यायालयाने हे आदेश दिले आहेत.

चौकशीसाठी माजी न्यायाधीश अभय मनोहर सप्रे यांच्या अध्यक्षतेखाली या प्रकरणाच्या चौकशी करण्यासाठी न्यायालयाने ६ सदस्यीय समितीचीही स्थापना केली आहे. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, न्यायाधीश पीएस नरसिम्हा आणि जेबी पार्डीवाला यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला. समिती स्थापन करण्याच्या निर्णयासोबत न्यायालयाने सेबीलाही या प्रकरणात दोन महिन्यात अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. शिवाय न्यायालयाने सेबीला सहकार्य करण्याचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा : Thackeray Vs Shinde : सत्तासंघर्षाच्या सुनावणीत आणखी एक तारीख, हरीश साळवेंनी आज काय युक्तिवाद केला?

समितीमध्ये इतर कोण?

सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश अभय मनोहर सप्रे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन केली आहे. याशिवाय यात न्यायमुर्ती जेपी देवधर, बॅंकर ओपी भट्ट, केव्ही कामथ, उद्योजक नंदन निलकेनी आणि शेखर सुंदरेशन सदस्य म्हणून काम करणार आहेत.

दरम्यान तसंच “सत्याचा विजय होईल” असं म्हणत गौतम अदानी यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या तज्ञ समिती स्थापन करण्याच्या आदेशाचे स्वागत केले. ते म्हणाले की, “अदानी ग्रुप सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत करत आहे. वेळ मर्यादेत सर्व गोष्टी समोर येतील आणि सत्याचा विजय होईल”

https://www.youtube.com/watch?v=BERIduaZOvg

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube