Thackeray Vs Shinde : सत्तासंघर्षाच्या सुनावणीत आणखी एक तारीख, हरीश साळवेंनी आज काय युक्तिवाद केला?

  • Written By: Published:
Thackeray Vs Shinde : सत्तासंघर्षाच्या सुनावणीत आणखी एक तारीख, हरीश साळवेंनी आज काय युक्तिवाद केला?

Thackeray Vs Shinde : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात चालू असलेल्या सत्ता संघर्षावरील सुनावणी आज संपेल अशी शक्यता असताना आजची सुनावणी संपल्यानंतर कोर्टाने सुनावणीसाठी नवीन तारीख दिली आहे. सुप्रीम कोर्टाला पुढील आठवड्यात होळीच्या सुट्टी असल्यामुळे सत्ता संघर्षाची सुनावणी होळीच्या सुट्टीनंतर सुरूच राहणार आहे. पुढील सुनावणी १४ मार्चला होणार आहे.

सुप्रीम कोर्टात दुसऱ्या आठवड्यातील तिसऱ्या म्हणजे शेवटच्या दिवशीची आज सुनावणी होती. याआधी ठाकरे गटाचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर शिंदे गटाकडून युक्तिवाद सुरु होता. ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी, देवदत्त कामत यांनी युक्तीवाद केला होता. शिंदे गटाकडून अ‍ॅड. नीरज किशन कौल, अ‍ॅड. मनिंदर सिंग आणि महेश जेठमलानी युक्तिवाद करणार आहेत, असं सांगितलं होत. पण आज अचानक जेष्ठ वकील हरीश साळवे यांनी लंडनहुन ऑनलाईन पद्धतीने सुनावणीला उपस्थिती लावली त्यामुळे सत्तासंघर्षामध्ये आणखी एक तारीख पडली.

हेही वाचा : Pune By-Poll Results 2023 : ‘चंद्रकांतदादा हे कोल्हापूरचे पार्सल’, विजयानंतर धंगेकरांचा पाटलांना टोला

पक्षांतर्गत लोकशाही हाच आमचा मुद्दा

आजच्या सुनावणी दरम्यान ठाकरे गटाचे वकील नीरज कौल यांनी आजचा युक्तिवाद सुरु केला. आपल्या युक्तिवादामध्ये कौल यांनी “पक्षांतर्गत लोकशाही हाच आमचा मुद्दा आहे. आमची केस त्यावरच आधारीत आहे. त्यामुळे आम्ही दहाव्या अनुसूचीत बसत नाही.” असा युक्तिवाद केला.

पण आज सुनावणीचा शेवटचा दिवस असताना शिंदे गटाच्या वतीने हरीश साळवे यांची सरप्राईज एन्ट्री झाली. साळवे यांनी थेट लंडनमधून ऑनलाईन पद्धतीने युक्तिवादात सहभागी झाले. हरीश साळवे यांचा युक्तिवाद आधीच्या वेळापत्रकात नव्हता. त्यामुळे आज दिवसभर सुनावणी होईल असं वाटतं असताना फक्त दोन तासात कोर्टाचे कामकाज संपवले कारण साळवे यांच्या एंट्रीमूळे आज दिवसभरामध्ये सुनावणी पूर्ण होऊ शकत नव्हती.

तर “उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतरच सरकार कोसळले. मगच राज्यपालांनी फ्लोअर टेस्ट घ्यायला सांगितले. ठाकरेंनी फ्लोअर टेस्ट ला सामोरं जायला पाहीजे होतं. जर फ्लोअर टेस्टला सामोरे गेले असते तर काय झालं असतं.” असा युक्तिवाद शिंदे गटाचे दुसरे वकील ॲड हरीश साळवे यांनी केला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube