वैद्यकीय शिक्षण, मोफत पर्यटक व्हिसा ते शिपिंग; रशिया अन् भारतातील करारानं काय बदलणार?

पंतप्रधान मोदी आणि पुतीन यांनी व्यापार आणि सेवांसाठी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये दर्शवली सहमती; २०३० पर्यंत होणार १०० अब्ज डॉलर्सचा व्यापार.

Untitled Design 50

Untitled Design 50

PM Modi and Putin meet : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) भारत दौऱ्यावर आले आहेत. दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी 5 डिसेंबर 2025 रोजी कृषी(Agri), शिपिंग, खत, वैद्यकीय शिक्षण (Medical Education) यासह अनेक क्षेत्रांत दोन्ही देशांमध्ये महत्त्वपूर्ण करार झाले. दोन्ही देशांत 100 अब्ज डॉलर्सच्या व्यापाराचा आकडा 2030 पर्यंत पूर्ण होईल असं दोन्ही देशांकडून सांगण्यात आलं. पंतप्रधान मोदी (PM Modi) आणि पुतीन (Putin)यांनी व्यापार आणि सेवांसाठी कोणत्या क्षेत्रांमध्ये सहमती दर्शवली आहे हे आपण तपशीलवार समजून घेऊया.

धोरणात्मक संवादाचे महत्त्व लक्षात घेऊन पुतीन यांनी पंतप्रधान मोदींचे या चर्चेबद्दल आभार मानले. ते म्हणाले की, ते मोदींशी नियमितपणे फोनवर बोलतात आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सतत संवाद साधतात. पुतीन यांनी या परिणामाचे वर्णन ‘करारांचे ठोस पॅकेज’ असे केले, जे रशिया-भारत (Russia-India) सहकार्याची व्याप्ती दर्शवते.

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासोबतच्या संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, भारत आणि रशियाने त्यांच्या अर्थव्यवस्थेच्या धोरणात्मक क्षेत्रात सहकार्य वाढवण्याच्या योजना आखल्या आहेत. आज मला आणि राष्ट्राध्यक्ष पुतीन यांना भारत-रशिया व्यापार मंचाला उपस्थित राहण्याची संधी मिळणार आहे. मला विश्वास आहे की हा मंच आपल्या व्यावसायिक संबंधांना नवी ताकद देईल. यामुळे निर्यात, सह-निर्मिती आणि सह-नवनिर्मितीचे नवे दरवाजेही उघडतील. युरेशियन इकॉनॉमिक युनियनबरोबर एफ. टी. ए. लवकर पूर्ण करण्यासाठी दोन्ही बाजू प्रयत्नशील आहेत.

Video : युक्रेन-रशिया युद्धात भारत तटस्थ नाही; पंतप्रधान मोदींनी पुतिन यांना तोंडावरच सांगून टाकलं

या क्षेत्रांवरील करार भारत आणि रशियाने केला होता. लेबर ऍक्टिव्हिटी अंतर्गत लोक भारतातून काम करण्यासाठी रशियाला जातील. आरोग्य शिक्षण, वैद्यकीय शिक्षण, अन्न सुरक्षा, शिपिंग आणि वाहतूक यावर दोन सामंजस्य करार करण्यात आले. तसेच, खत, सीमाशुल्क, टपाल सेवांबाबतही दोन्ही देशांमध्ये चर्चा झाली आहे. भारत आणि रशिया यांच्यात संयुक्त घोषणापत्र जारी केले जाईल. त्याच वेळी दोन्ही देशांनी संयुक्त आर्थिक दृष्टीकोन-2030 वर भर दिला आहे.

कृषी क्षेत्रात वापरले जाणारे प्रमुख खत असलेल्या युरियाबाबतही देशाने रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्याशी करार केला आहे. दोन्ही देश मिळून युरियाचे उत्पादन करतील, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. “गेल्या 8 दशकांत जगाने अनेक बदल पाहिले आहेत, परंतु भारत आणि रशिया स्थिर राहिले आहेत आणि अधिक बळकट होत आहेत. ऊर्जा सुरक्षा हा भारत-रशिया संबंधांचा एक महत्त्वाचा भाग आहे. भारत आणि रशिया आर्क्टिक, नौवहन, महत्त्वपूर्ण खनिजे आणि जहाजबांधणीमध्ये सहकार्य मजबूत करतील. रशियामध्ये नवीन भारतीय दूतावास उघडण्यात येणार आहे.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी राजघाटावर महात्मा गांधींसाठी काय लिहिले? पत्र व्हायरल

पर्यटन व्हिसा मोफत उपलब्ध होतील, असे पंतप्रधान मोदी यांनी आर्क्टिक सहकार्य आणि संयुक्त जहाजबांधणीबाबतच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियन नागरिकांना 30 दिवसांचा विनामूल्य पर्यटन व्हिसा देण्याची घोषणा केली आहे. मला विश्वास आहे की येणाऱ्या काळात आपली मैत्री आपल्याला जागतिक आव्हानांचा सामना करण्याची शक्ती देईल आणि हा विश्वास आपले सामायिक भविष्य आणखी समृद्ध करेल. “युक्रेनमध्ये शांततेसाठीच्या सर्व प्रयत्नांचे आम्ही स्वागत करतो.

मोदींसोबत झालेल्या चर्चेनंतर पुतीन म्हणाले की, भारतासोबत चर्चा चांगल्या आणि मैत्रीपूर्ण वातावरणात झाली. रशिया आणि भारत व्यापार उलाढाल 100 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवू शकतात. भारताला अखंडित इंधन पुरवठा सुरू ठेवण्यास रशिया तयार आहे. मॉस्को आणि नवी दिल्ली भारत आणि युरेशियन इकॉनॉमिक युनियन यांच्यात मुक्त व्यापार करारावर काम करत आहेत. आम्ही सुरक्षा, अर्थव्यवस्थेशी संबंधित अनेक करारांवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. 100 अब्ज डॉलर्सचा व्यापार निश्चितपणे 2030 पर्यंत पूर्ण होईल. परस्पर व्यापारासाठी कोणत्या समस्या येत आहेत याची खूप मोठी यादी पंतप्रधानांनी दिली आहे, आम्ही त्यावर लक्ष देऊ. रशिया हा तेल, कोळसा, वायूचा “विश्वासार्ह पुरवठादार” आहे आणि भारताला उर्जेचा “अखंड पुरवठा” करण्यास तयार आहे. हे देखील पंतप्रधानांनी यावेळी अधोरेखित केलं.

Exit mobile version