Video : मोदींनी संधी साधली! आऊटडेटेड फोनचं उदाहरण देत काँग्रेसवर केला ‘प्रहार’

नवी दिल्ली : आगामी लोकसभेपूर्वी देशातील मोठ्या राजकीय पक्षांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यास सुरूवात केली आहे. दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) आऊटडेटेड मोबाईल फोनचं उदाहरण देत काँग्रेसवर (Congress) जोरदार प्रहार केला आहे. 2014 पूर्वीचे सरकार हँग मोडमध्ये होते, रिस्टार्ट करूनही काही उपयोग नव्हता, बॅटरीही निरुपयोगी होती. मात्र, 2014 मध्ये देशातील […]

मोदींनी संधी साधली! आऊटडेटेड फोनचं उदाहरण देत काँग्रेसवर केला प्रहार

Letsupp Image 2023 10 27T125829.985

नवी दिल्ली : आगामी लोकसभेपूर्वी देशातील मोठ्या राजकीय पक्षांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यास सुरूवात केली आहे. दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) आऊटडेटेड मोबाईल फोनचं उदाहरण देत काँग्रेसवर (Congress) जोरदार प्रहार केला आहे. 2014 पूर्वीचे सरकार हँग मोडमध्ये होते, रिस्टार्ट करूनही काही उपयोग नव्हता, बॅटरीही निरुपयोगी होती. मात्र, 2014 मध्ये देशातील नागरिकांनी अशा कालबाह्य फोनसारखे सरकारला रामराम केला आणि भाजपला (Bjp Government) संधी दिल्याचे मोदी यावेळी म्हणाले. मोदींच्या या टीकेला आता काँग्रेसकडून काय प्रत्युत्तर दिले जाते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (PM Modi Attack On Congress Government In Delhi India Mobile Congress 2023 )

‘आठवड्यात 70 तास..,’; चीन-जपानला टेक ओव्हर करण्यासाठी नारायणमुर्तींनी सांगितला फॉर्मुला

काँग्रेसवर टीका करताना पीएम मोदी म्हणाले, “आम्ही जगातील टॉप 3 स्टार्टअप इकोसिस्टमपैकी एक झालो आहोत. 2014 पूर्वी भारतात 100 स्टार्टअप होते आणि आता ते 1 लाखांपर्यंत पोहोचले आहे. 10-12 वर्षांपूर्वीच्या काळ बघितला तर,त्यावेळचे मोबाईल सारखे सारखे हँग होत होते. अशीच परिस्थिती त्या काळच्या सरकराचीदेखील होती. 2014 पूर्वीचे सरकार हँग मोडमध्ये होते, रिस्टार्ट करूनही काही उपयोग नव्हता, बॅटरीही निरुपयोगी होती. त्यामुळे 2014 मध्ये देशातील करोडो मतदारांनी हँग झालेले फोन आणि सरकार दोन्हीना बाजूला करत भाजपला देशसेवा करण्याची संधी दिली. भाजप सत्तेत आल्यापासून देशात काय काय बदल झाले हे वेगळे सांगण्याची गरज नसून सर्व गोष्टी नागरिकांनी अनुभवल्या आहेत.

नेहरूंना भेटण्यासाठी बबनरावांनी थेट दिल्ली गाठली…’चाचा मला शिकायचे आहे, पण…

2014 पूर्वी देशात मोबाईल फोन आयात केले जात होते. मात्र, भाजप सत्तेत आल्यानंतर आज आपला देश मोठ्या प्रमाणात मोबाईल फोन निर्यात करत आहे. देशात  5G मोबाइल सेवा जलद सुरू झाल्याचे सांगत एका वर्षात चार लाख 5G बेस स्टेशन स्थापित करण्यात आल्याचे यावेळी मोदींनी सांगितले. मोबाईल ब्रॉडबँड स्पीडमध्ये भारत 118 व्या स्थानावरून आता 43 व्या स्थानावर पोहोचल्याचे सांगत मोदींनी 6G मध्ये भारत आघाडीची भूमिका बजावेल असा विश्वास व्यक्त केला. भांडवल, संसाधने आणि तंत्रज्ञानात प्रवेश हे सरकारचे प्राधान्य असून, आज संपूर्ण जग ‘मेड इन इंडिया’ फोन वापरत आहे.

Exit mobile version