Download App

पंतप्रधान मोदी ‘विश्वगुरू’, पण खलिस्तानवाद्यांचा… ठाकरे गटाचा निशाणा

PM Modi Criticize By Thackery group : ठाकरे गटाने पंतप्रधान मोदींवर (PM Modi) कॅनडातील खलिस्तान्यांच्या मुद्द्यावरून टीका केली आहे. खलिस्तानी अतिरेकी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येत भारताचा हात असल्याचा गंभीर आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो (Justin Trudeau) यांनी केला होता. त्यांच्या या आरोपांनंतर दोन्ही देशांतील संबंध (India Canada Tension) प्रचंड ताणले गेले होते.

Mahira Khan: पाकिस्तानी अभिनेत्री दुसऱ्यांदा चढली बोहल्यावर! Video व्हायरल…

भारताने ताठर भूमिका घेतल्याने अखेर भारताचे हे धोरण पाहता ट्रुडो नरमले. मात्र तरी देखील विश्वगुरू अशी ओळख मिळवणारे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या मूठभर भारतविरोदी फौजांचा बिमोड करू शकत नाहीत. अशी टीका ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. ठाकरे गटाचं मुखपत्र सामनाच्या आजच्या अग्रलेखातून ही टीका करण्यात आली आहे.

पुणे ISIS मॉड्यूल प्रकरणी मोस्ट वॉन्टेड दहशवाद्याला दिल्लीत अटक; आणखी दोघांचा शोध सुरु

पंतप्रधान मोदी विश्वगुरू असूनही…
कॅनडातील खलिस्तान्यांच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाकडून ठाकरे गटाचं मुखपत्र सामनाच्या आजच्या अग्रलेखातून टीका करण्यात आली त्यामध्ये म्हटले आहे की, पंतप्रधान मोदी हे ‘विश्वगुरू’ असले तरी ते भारतविरोधी फौजांचा बिमोड करू शकलेले नाहीत. कॅनडा आणि इंग्लंडमधील मूठभर खलिस्तानवादी म्हणजे संपूर्ण शीख समाज नाही. पण देशातील वातावरण बिघडविण्यास हा मूठभर समाज कारणीभूत ठरतो आहे.

Khamgaon-Malkapur accident : रस्त्याच्या कडेला गाढ झोपेत असतांना ट्रकने चिरडले, चौघांचा मृत्यू

यामागे केवळ धर्मकारण नाही तर राजकारण आहे. कॅनडा, इंग्लंडमधील भारतीय उच्चायुक्तांच्या कार्यालायांवर बॉम्ब फेकले जात आहेत. तिरंगा जाळला जात आहे. मंदीरांवर हल्ले केले जात आहेत. ही सामान्य बाब नाही. असं परराष्ट्रमंत्री सांगतात. पण हे 2024 पर्यंत असंच सुरू राहणार का? असा सवाल सामनातून करण्यात आला आहे.

तसेच समानातून असंही म्हटलं आहे की, सुनकसाहेब भारतीय वंशांचे ‘प्राऊड हिंदू’ आहेत. पण त्यांनी त्यांच्या भूमीवर वळवळणारे भारतविरोधी शेपूट ठेचलेले नाही. त्यांना साधा दमही दिलेला नीही. असं म्हणत ठाकरे गटाने मोदींसोबत इंग्लंडचे पंतप्रधान जे भारतीय वंशांचे आहेत त्यां ऋषी सूनक यांच्यावर देखील निशाणा साधला आहे.

Tags

follow us