Mahira Khan: पाकिस्तानी अभिनेत्री दुसऱ्यांदा चढली बोहल्यावर! Video व्हायरल…

Mahira Khan: पाकिस्तानी अभिनेत्री दुसऱ्यांदा चढली बोहल्यावर! Video व्हायरल…

Mahira Khan 2nd Wedding: किंग खानची जवळची मैत्रीण (King Khan) पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान (Mahira Khan) गेल्या काही दिवसांपासून खासगी आयुष्यामुळे जोरदार चर्चेत आली आहे. नुकतंच अभिनेत्रीने रविवारी बॉयफ्रेंड सलीम करीमबरोबर दुसऱ्यांदा बोहल्यावर चढली आहे. ‘रईस’ (Raees) सिनेमाच्या माध्यमातून तिने मनोरंजन क्षेत्रात पदार्पण केले होते.


बॉयफ्रेंड सलीम आणि माहिराने एकमेकांना जवळपास ५ वर्ष एकत्र डेट करत होते. दरम्यान, एकमेकांना डेट केल्यावर त्यांनी आता दुसऱ्यांदा बोहल्यावर चढण्याचा निर्णय घेतला आहे. माहिरा आणि सलीमचा नुकताच रविवारी पाकिस्तानामध्ये शाही विवाह पद्धतीने बोहल्यावर चढली आहे. सध्या त्यांच्या लग्नाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडिया जोरदार व्हायरल होत आहे. त्यांच्या शाही विवाहचा पहिला व्हिडीओ अभिनेत्रीचा मॅनेजर अनुशय तलहा खानने सोशल मीडियावर शेअर केला आहे.


सध्या त्यांच्या शाही विवाहचे व्हिडीओ बघून चाहते त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार व्हायरल व्हिडीओत, माहिराने विवाह सोहळ्यात पेस्टल रंगाचा घागरा घातलेला असून तिने ओढणीने आपला चेहरा झाकून घेतला आहे. अभिनेत्रीच्या ह्या क्यूट लूकने चाहत्यांचे लक्ष वेधत आहे. तर सलीमने काळ्या रंगाची शेरवानी आणि त्यावर निळ्या रंगाची पगडी परिधान केल्याचे बघायला मिळत आहे. दोघांच्याही जोडीची नेटकऱ्यांमध्ये जोरदार चर्चा होत असल्याचे बघायला मिळत आहे.

सध्या त्यांच्या निकाहमधील काही व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. या जोडप्यांचे चाहत्यांकडून सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत असल्याचे बघायला मिळत आहे. माहिरा पेशाने पाकिस्तानी अभिनेत्री असून, सलीम करीम पेशाने बिझनेसमन आहे. यावेळी त्यांच्या शाही विवाहसाठी, दोघांचेही कुटुंबीय, त्यांचा मित्र परिवार यांच्या उपस्थितीत हा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला आहे. माहिराच्या खासगी आयुष्याविषयी सांगायचे झाले तर, सलीम करीमबरोबर माहिरा दुसऱ्यांदा बोहल्यावर चढली आहे.

Shyamchi Aai: दिवाळीत भेटायला येणार श्यामची आई, पहिलं पोस्टर समोर

माहिराने पहिलं लग्न अली अक्सरबरोबर २००७ मध्ये केलं होतं. त्या दोघांची देखील भेट लॉस एंजेलिसमध्ये झाली होती. अली अक्सरी हा पेशाने अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता आहे. माहिराला अली अक्सरपासून अलझान नावाचा मुलगा आहे. परंतु २०१५ साली दोघांनीही एकमेकांपासून वेगळा होण्याचा निर्णय घेतला होता. मुलगा अलझानचा सांभाळ माहिराच करत असल्याची माहिती मिळाली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube