Download App

RSS चा घुसखोरीविरोधी रोडमॅप तयार! PM मोदींची रणनिती नेमकी कशी? दिल्लीत भाषण…

पंतप्रधान मोदींनी महत्त्वपूर्ण विधानं केलं. संघाकडे घुसखोरीच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी एक ठोस रोडमॅप तयार आहे.

PM Modi Discuss RSS Model National Security : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) शताब्दी वर्षानिमित्त बुधवारी दिल्लीमध्ये भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. संघाच्या 100 वर्षांच्या कार्याचा गौरव करत मोदींनी विशेष स्मारक डाक तिकीट आणि स्मृती नाण्याचे प्रकाशन केले.

संघाच्या कार्याचा गौरव

प्रकाशित नाण्याच्या एका बाजूला सत्यमेव जयते आणि भारत-इंडिया असे शब्द कोरलेले (PM Modi) आहेत, तर दुसऱ्या बाजूला भारतमातेची आकृती तसेच संघ कार्यकर्त्यांचे चित्रण करण्यात आले असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ 100 वर्ष असा उल्लेख आहे. डाक तिकिटावरही संघाच्या (RSS) कार्याचा गौरव करण्यात आला आहे.

मोदींनी केली दोन महत्त्वपूर्ण विधानं

या सोहळ्यात भाषण करताना पंतप्रधान मोदींनी दोन महत्त्वपूर्ण विधानं केली. पहिले म्हणजे – संघ आणि स्वयंसेवकांचा एकच ध्यास आहे, तो म्हणजे ‘राष्ट्र प्रथम’. दुसरे म्हणजे – संघाकडे घुसखोरीच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी एक ठोस रोडमॅप तयार (RSS Model National Security) आहे. मोदी म्हणाले, दुसऱ्या देशांवर आर्थिक अवलंबित्व, आपल्या समाजातील एकता तोडण्याचे डावपेच, लोकसंख्येतील बदलाचे षडयंत्र – या सर्वांवर सरकार जलदगतीने उपाययोजना करत आहे. या पार्श्वभूमीवर मला आनंद आहे की संघानेही या आव्हानांवर मात करण्यासाठी स्पष्ट आणि ठोस मार्गदर्शक योजना तयार केली आहे.

‘घुसखोरीविरोधी’ मॉडेल नेमका कसा?

मोदींच्या या विधानानंतर देशभरात चर्चा रंगली आहे की संघाचा ‘घुसखोरीविरोधी’ मॉडेल नेमका कसा असेल? सध्या संघाचे संपूर्ण भारतात एक कोटीहून अधिक कार्यकर्ते आहेत. हे कार्यकर्ते जिल्हा, तालुका आणि गावागावात सक्रिय असून स्थानिक पातळीवर त्यांचा मोठा प्रभाव आहे. त्यामुळे हे स्वयंसेवक घुसखोरांची ओळख पटविण्यात प्रशासन आणि पोलिसांना मदत करू शकतात, अशी अपेक्षा आहे.

कडक कायदे आणि मजबूत धोरणं

संघाची मागणी नेहमीच अशी राहिली आहे की घुसखोरी रोखण्यासाठी देशात कडक कायदे आणि मजबूत धोरणं असली पाहिजेत. आता पंतप्रधानांनीही सार्वजनिकरित्या या रोडमॅपचा उल्लेख केल्याने पुढील काळात या विषयावर मोठ्या हालचाली होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

follow us