RSS चे षडयंत्र… मी आंबेडकरी, विजयादशमी सोहळ्याला उपस्थित राहणार नाही; कमलताई गवईंचे स्पष्टीकरण

Kamaltai Gavai : अमरावती शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी सोहळ्यात सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या आई कमलताई देखील उपस्थित राहणार

  • Written By: Published:
Kamaltai Gavai

Kamaltai Gavai : अमरावती शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी सोहळ्यात सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या आई कमलताई देखील उपस्थित राहणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर जोराने सुरु आहे. मात्र आपण या कार्यक्रमाला हजर राहणार नसल्याचे स्पष्टीकरण सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या आई कमलताई यांनी दिले आहे. आरएसएसचे हे षडयंत्र आहे. मी निमंत्रण स्वीकारले नाही असं देखील कमलताई म्हणाल्या.

तर आता कमलताई (Kamaltai Gavai) यांचे स्वहस्ताक्षरातील एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पत्रात मी आंबेडकरी आहे, संविधानाप्रती प्रामणिक राहीन असे कमलाताई गवई यांनी या पत्रात नमूद केले आहे.

 पत्रात काय म्हटले आहे ?

मी आंबेडकरी आहे, संविधानाप्रती प्रामाणिक राहीन- कमलाताई गवई

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) विजयादशमी सोहळ्याला आपण उपस्थित राहणार असल्याची बातमी धादांत खोटी आहे. दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टची संस्थापक अध्यक्ष म्हणून आंबेडकरी विचाराने ओतप्रोत आणि देशाच्या संविधानाप्रती माझे घराणे अविरत प्रामाणिक असल्यामुळे ‘आरएसएस’च्या अमरावतीत होणाऱ्या कार्यक्रमाला हजर होणार नाही. सामाजिक जाणिवेला कुठल्याही प्रकारे दु:ख होऊ देणार नाही. महाराष्ट्रातीलच नव्हे, तर सर्व भारतातील जनतेने याची नोंद घ्यावी. विजयादशमी ही हिंदू संस्कृती असली, तरी आम्हाकरीता धम्मचक्र प्रवर्तन दिन अशोका विजयादशमी महत्वपूर्ण आहे.

अपप्रचार किंवा बातमीला बळी न पडता या निवेदनाद्वारे प्रकाशित झालेल्या बातमीचा निषेध व धिक्कार करते. तमाम माझ्या आंबेडकरी जनतेने याची दखल घेऊन माझ्यावर विश्वास ठेवावा. मला विश्वासात न घेता किंवा लेखी होकार न घेता हे आरएसएसचे षडयंत्र आहे. सदर्हू निमंत्रण मी स्वीकृत करीत नाही. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सर्वांना गवई परिवारातर्फे मन:पूर्वक शुभेच्छा.

अभिनेता विजयची मोठी घोषणा, करुर चेंगराचेंगरी प्रकरणात मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 20 लाख रुपयांची मदत

तर दुसरीकडे अमरावतीमध्ये 5 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी सोहळ्यात सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या आई कमलताई गवई या मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत होते.

follow us