डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यक्रमादरम्यान गोळीबार; पंतप्रधान मोदी म्हणाले, लोकशाहीत…

PM Modi On Donald Trump : वॉशिंग्टन हिल्टन हॉटेलमधील 'कॉरेस्पॉन्डंट्स डिनर' कार्यक्रमादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या

PM Modi On Donald Trump

PM Modi On Donald Trump

PM Modi On Donald Trump : वॉशिंग्टन हिल्टन हॉटेलमधील ‘कॉरेस्पॉन्डंट्स डिनर’ कार्यक्रमादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या उपस्थित गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने संपूर्ण जगात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात हल्लाखोराला अटक देखील करण्यात आली आहे. तर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरुक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.  तर दुसरीकडे आता या धक्कादायक घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत पहिली प्रतिक्रिया देत भारताची भूमिका स्पष्ट केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) म्हणाले की, वॉशिंग्टन डी.सी. (Washington D.C.) येथील एका हॉटेलमध्ये नुकत्याच घडलेल्या सुरक्षाविषयक घटनेनंतर, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प, फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प आणि उपराष्ट्राध्यक्ष हे सुखरूप व सुरक्षित असल्याचे समजून मला समाधान वाटले. मी त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा देतो. लोकशाहीत हिंसेला कोणतंही स्थान नाही आणि अशा कृत्यांचा पूर्णपणे निषेध केला पाहिजे असं पंतप्रधान मोदी यांनी एक्सवर म्हटले आहे.

नेमकं घडलं काय?

अमेरिकेच्या वेळेनुसार, शनिवारी रात्री 8.45 वाजता वॉशिंग्टन हिल्टन हॉटेलमधील ‘कॉरेस्पॉन्डंट्स डिनर’ (Correspondents’ Dinner) कार्यक्रमादरम्यान अचानक गोळीबाराचा आवाज ऐकू आल्याने राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या सिक्रेट सर्व्हिसच्या एजंट्सनी तात्काळ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना घटनास्थळावरून सुखरूप बाहेर काढले आहे. असोसिएटेड प्रेसच्या वृत्तानुसार, सध्या तरी कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. या कार्यक्रमाला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, त्यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प आणि उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स हे देखील उपस्थित होते.

डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया

या घटनेनंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ट्रम्प यांनी सांगितले की, जेव्हा गोळीबाराचे आवाज ऐकू आले, तेव्हा सुरुवातीला त्यांना वाटले की कदाचित एखादे जेवणाचे ताट (ट्रे) खाली पडले असावे कारण तो आवाज बऱ्याच अंतरावरून येत असल्याचे भासत होते. पण ‘फर्स्ट लेडी’ मेलानिया ट्रम्प यांनी तो आवाज गोळीबाराचाच असल्याचे तात्काळ ओळखले. मला वाटते की नक्की काय घडले आहे, हे तिला (मेलानियाला) त्याच क्षणी समजले होते.

सांगली, पुणे, नांदेड अन्.. ‘या’ जिल्ह्यांमध्ये आज पुन्हा अवकाळी पाऊस; यलो अलर्ट जारी

यानंतर त्यांच्या पत्नीने त्यांना उद्देशून म्हटले होते, हा काही चांगला आवाज नाहीये. तर दुसरीकडे हल्लेखोराचा उद्देश अद्याप स्पष्ट झालेला नाही परंतु त्यांच्या मते, ती व्यक्ती ताब्यात घेतल्यानंतरही अत्यंत धोकादायक वाटत होती अशी माहिती डोनाल्ड ट्रम्प यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

Exit mobile version