सांगली, पुणे, नांदेड अन्.. ‘या’ जिल्ह्यांमध्ये आज पुन्हा अवकाळी पाऊस; यलो अलर्ट जारी
Maharashtra Weather Alert : राज्यातील अनेक भागात सध्या तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होताना दिसत आहे.
Maharashtra Weather Alert : राज्यातील अनेक भागात सध्या तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होताना दिसत आहे. दिवसंदिवस वाढत असणाऱ्या उन्हाचा परिणाम दैनंदिन जीवनावर होताना दिसत आहे. तर दुसरीकडे आता राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. पुढील 48 तासांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळ, हलका आणि माध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्र (Madhya Maharashtra) आणि मराठवाड्यातील (Marathwada) काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळ, हलका किंवा मध्यम पावसाची आज शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही तासांमध्ये कोल्हापूर, सांगली, पुणे (Pune) , सातारा, नांदेड, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये रिमझिम पाऊस तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. या जिल्ह्यामंध्ये पावसाची शक्यता असल्याने या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यक्रमादरम्यान गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराचा पहिला फोटो समोर
तर दुसरीकडे विदर्भातील अकोला, अमरावती, चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम राहणार असल्याची देखील माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.