Download App

तिकीट दर ते सुविधा जाणून घ्या ‘वॉटर मेट्रो’ची खासियत

Kochi Water Metro :  आत्तापर्यंत आपल्या देशामध्ये जमीनीवर व पाण्याच्या खालून मेट्रो धावली आहे. पण आता चक्क पाण्याच्यावर मेट्रो धावणार आहे. केरळच्या कोच्ची येथे या मेट्रोची सुरुवात होणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मंगळवारी 25 एप्रिल रोजी या मेट्रो रेल्वेचे लोकार्पण करणार आहेत. केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी या रेल्वेला ड्रीम प्रोजेक्ट म्हटले आहे.

कोची वॉटर मेट्रो ही पोर्ट सिटीमध्ये 1,136.83 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आली आहे. या प्रकल्पांतर्गत कोचीच्या आसपास असलेली 10 बेटे जोडली जाणार आहेत. यासाठी बॅटरीवर चालणाऱ्या हायब्रीड बोटींचा वापर करण्यात येणार आहे. जिथे या बोटींमध्ये प्रगत तंत्रज्ञान असेल. त्याचबरोबर ते पर्यावरणपूरकही असेल. केरळ वॉटर मेट्रोने पूर्णपणे वातानुकूलित, इको-फ्रेंडली असण्यासोबतच दिव्यांगांच्या सुविधांचीही काळजी घेतली आहे.

YSSharmila : मुख्यमंत्र्यांच्या बहिणीची दबंगगिरी… थेट पोलीस अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावली

वॉटर मेट्रो प्रकल्पात 78 इलेक्ट्रिक बोटी आणि 38 टर्मिनल असतील. या प्रकल्पाला केरळ सरकार आणि KFW द्वारे निधी दिला जातो. KFW ही फंडिंग एजन्सी आहे. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात ही मेट्रो हायकोर्ट-वायपिन टर्मिनल ते विट्टीला-कक्कनड टर्मिनल दरम्यान सुरू केली जाईल.

मिळालेल्या माहितीनुसार, वायपिन ते हायकोर्ट हे अंतर 20 मिनिटांत तर विट्टीला ते कक्कनड हे अंतर 25 मिनिटांत गाठता येईल. सुरुवातीला सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत वॉटर मेट्रो धावणार आहे. तर पीक अवर्समध्ये दर 15 मिनिटांनी मेट्रो उपलब्ध असेल.

अतिक अहमदच्या कार्यालयात सापडले आक्षेपार्ह साहित्य, पोलीस यंत्रणा अर्लट

वॉटर मेट्रोमध्ये डिस्काउंट पासची सुविधाही देण्यात आली आहे. साप्ताहिक पास 180 रुपयांना आहे. यामधून 12 वेळा प्रवास करता येऊ शकतो. 30 दिवसांमध्ये 50 वेळा प्रवास केल्यास त्याची किंमत 600 रुपये असेल. तर 90 दिवसांमध्ये 150वेळा प्रवास केल्यास त्याची किंमत 1,500 रुपये आहे.

Tags

follow us