PM Modi : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी आज संसदेत त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील आणि 17 व्या लोकसभेतील सभागृहातील शेवटचे भाषण केले. यावेळी ते भावनिक झाले होते. सर्वांचं मोदींकडून यावेळी अभिनंदन करण्यात आलं. तसेच लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांचे देखील आभार मानले. ते म्हणाले की, गेल्या 5 वर्षात तत्कालीन अध्यक्ष सुमित्रा महाजन या कधीतरी स्मित हास्य करत होत्या मात्र तुम्ही काहीही झालं तरी कायम हसतमुख होतात.
Prithviraj Chavan : राज्यातील गुन्हेगारीला सरकारकडून राजाश्रय; पृथ्वीराज चव्हाण कडाडले
तुम्ही कधीही भेदभाव नाही केला. कठीण परिस्थितीतही तुम्ही सभागृहाला सांभाळलं. याच पाच वर्षांत जगभारातील मानवजातिने कोरोना सारखं मोठं संकट पाहिलं. त्या काळात खासदारांनी आपल्या पगारातून 30 टक्के रक्कम कोरोनासाठी दान करून देशवासीयांना एक विश्वास दिला. तसेच याच पाच वर्षांत संसदेच्या कॅन्टीनमध्ये सर्वासाठी समान दर आकारले जाऊ लागले. कारण यावरून खासदारांवर टीका केली जात होती. की, बाहेर तेच पदार्थ जास्त किंमतींना मिळतात मात्र खासदरांना कमी किंमतीत मिळतात.
गायकवाडांचा गोळीबार ते वागळेंवरील हल्ला : शिंदे सरकारचे विसर्जन करा, मविआचे नेते राज्यपालांकडे
त्याचबरोबर संसदेच्या नव्या इमारतीचं उद्घाटन याच कार्यकाळात झालं. यामध्ये स्वातंत्र्या आणि ऐतिहासिक वारसा जपणारे विविध प्रातिनिधिक गोष्टी स्थापन करण्यात आल्या त्यापैंकी एक म्हणजे सैंगल. तसेच भारताने केलेल्या G20 च्या आयोजनाची जगभरात चर्चा झाली. अध्यक्षांचे मी आणखी एका गोष्टीसाठी आभार मानतो की, त्यांनी जुन्या संसदेत साजऱ्या केल्या जाणाऱ्या महापुरूषांच्या जयंत्यांना लोक 10 मिनिट येत होते.
मात्र आता या निमित्त देशभरात विद्यार्थ्यांसाठी निबंध आणि भाषण स्पर्धा घेतल्या जात आहेत. त्यातून राज्यातून 2 विद्यार्थ्यांना निवडलं जात. त्यांना दिल्लीत बोलावून त्यांना संसदेच कामकाज दाखवलं जातं. यातून एक चांगली परंपरा जोपासली गेली. त्यासाठी अध्यक्षांचे आभार मानले. तसेच इतर अनेक गोष्टींचा गेल्या पाच वर्षांतील लेखाजोखी मांडत. मोदी यांनी आपल्या 17 व्या लोकसभेतील शेवटच्या भाषणात कृतज्ञता व्यक्त केली.