नवी दिल्ली : आजपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन (Session of Parliament) सुरू झाले आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदीही (Prime Minister Narendra Modi) संसदेत पोहोचले. येथे पोहोचताच त्यांनी सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या खासदारांची भेट घेतली. यावेळी त्यांनी काँग्रेस खासदार सोनिया गांधी यांचीही भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये लोकसभेच्या सभागृहात काही वेळ चर्चा झाली, त्यानंतर पीएम मोदी त्यांच्या आसनावर जाऊन बसले. (PM Modi meets Sonia Gandhi in Lok Sabha)
https://www.youtube.com/watch?v=YvWYxKSfwwg
संसदेच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नेते सहसा एकमेकांना शुभेच्छा देतात. आज सभागृहाची बैठक सुरू होण्याच्या काही वेळापूर्वी पंतप्रधान मोदींनी सभागृहातील सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांचे गॅलरीत जाऊन नेत्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांनी सोनिया गांधींशी देखील संवाद साधला. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पीएम मोदी आणि सोनिया गांधी यांची भेट घेतल्यानं सोशल मीडियावर चर्चांना उधान आलं. दरम्यान, आता सोनिया गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात काय चर्चा झाली? याचा खुलासा काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांनी केला आहे.
Jui Gadkari: इर्शाळवाडी दुर्घटनेवर अभिनेत्री जुई गडकरीची ‘ती’ पोस्ट चर्चेत! म्हणाली, ‘डोकं सुन्नं…’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून सोनिया गांधी यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बंगळुरूमध्ये विरोधकांच्या बैठकीतही सोनिया गांधी थेट रुग्णालयातून निघून गेल्या. त्यामुळे पंतप्रधान मोदींनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. याशिवाय, रंजन चौधरी यांनी सांगिलेत की, दोन्ही नेत्यांच्या भेटीदरम्यान सोनिया गांधी यांनी पंतप्रधान मोदींकडे मणिपूर हिंसाचाराच्या घटनांवर संसदेत चर्चा करण्याची मागणी केली. त्यामुळे मणिपूरच्या घटनांवर संसदेत चर्चा होणार की नाही याकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे.
मणिपूरमध्ये हिंसाचार सुरु असतांना काही महिलांना जमावाने विवस्त्र केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून याप्रकरणी विरोधकांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी मोदींनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरमधील घटना लज्जास्पद असून दोषींना सोडले जाणार नाही, त्यांना कठोर शिक्षा केली जाईल, असे म्हटले आहे, सोबतच त्यांनी मुख्यमंत्र्यांना मणिपूरमध्ये कायदा आणि सुव्यवस्था कडक करण्याच्या सूचना दिल्या आहेत.