Jui Gadkari: इर्शाळवाडी दुर्घटनेवर अभिनेत्री जुई गडकरीची ‘ती’ पोस्ट चर्चेत! म्हणाली, ‘डोकं सुन्नं…’

Jui Gadkari: इर्शाळवाडी दुर्घटनेवर अभिनेत्री जुई गडकरीची ‘ती’ पोस्ट चर्चेत! म्हणाली, ‘डोकं सुन्नं…’

Jui Gadkari: रायगड येथील इर्शाळवाडीच्या येथे घरांवर दरड कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. एनडीआरएफच्या (NDRF) अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. मातीच्या ढिगाऱ्याखाली अनेक घरे दबली गेल्याचे दिसून येत आहे. अनेक स्तरातून या दुर्घटनेवर मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त केली जात आहे. यावर आता अभिनेत्री जुई गडकरी (Jui Gadkari) हिने या दुर्घटनेवर एक पोस्ट शेअर (Post Share) केली आहे.


इर्शाळगडाच्या पायथ्याशी ही वाडी आहे. या ठिकाणी जाण्यासाठी चांगल्या प्रकारचे रस्ते नसल्याने मानवली गावातून पायी चालत जावं लागत असल्याचे यावेळी तिने सांगितले आहे. संपूर्ण वाडीत एकूण ४८ कुटुंबं वास्तव्यास आहेत. तिथली लोकसंख्या २२८ इतकी आहे. दरम्यान या दुर्घटनेच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बचावकार्य होत असल्याचे देखील तिने यावेळी सांगितले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी देखील घटनास्थळी लगेचच धाव घेतली आहे. या दुर्घटनेनंतर अभिनेत्री जुईने (Jui Gadkari) अगोदरच्या इर्शाळवाडीला फिरायला गेल्यानंतरचा एक अनुभव सांगितला आहे.

ईर्शाळगडावर गेलो तेव्हाच्या काही आठवणी… सकाळपासुन ईर्शाळवाडी वर दरड कोसळल्याची बातमी बघतेय आणि डोकं सुन्नं झालय… तिथल्या आऊच्या हातचा स्वयंपाक अजुनही आठवतोय… एव्हढ्या ऊंचावर असलेली ठाकरवाडी… विज नाही.. मेडीकल, जिवनावश्यक वस्तु असं वरती ठकरवाडीत काहीच नाही.. तरीही सदैव चेहरा हसरा… कसं काय जमतं त्यांना? प्रत्येक वेळेला १-१.३० तास चढुन वर जाणं किती अवघड ए… पण तरीही कसलीही complaint नं करता खुप कष्टं करुन मानाने जगतात ही ठाकरं… माझ्या खुप जवळचा विषय आहे ठाकरं आणि ठाकरवाड्या… कितीतरी वाड्यांवर मी फिरलिये… त्यांच्या हातचं चविष्ठं जेवलिये… बातमी बघुन खुप वाईट वाटलं… सगळे सुखरुप असुदेत..

Manipur महिलांवरील अत्याचाराचा व्हिडीओ पाहून कलाकारांनी व्यक्त केला संताप, ट्वीट करत म्हणाले…

इर्शाळवाडी हा आदिवासी पाडा भाग आहे, तसेच तो गाव डोंगराच्या उतारावर आहे. दरड कोसळल्याची माहिती मिळताच मंत्री उदय सामंत, दादा भुसे लगेचच दुर्घटनास्थळी दाखल झाले आहेत. एनडीआरएफची टीम देखील दुर्घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच बचावकार्यास सुरुवात करण्यात असल्याची माहिती यावेळी तिने दिली आहे. या घटनेची माहिती मिळताच नवी मुंबई अग्निशमन दल आणि एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली असून बचावकार्य सुरु आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube