Download App

PM मोदी सुट्टी घेत नाहीत! व्हायरल होणाऱ्या चर्चांवर अखेर PMO चे शिक्कामोर्तब

  • Written By: Last Updated:

नवी दिल्ली : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) अहोरात्र काम करतात अशा बातम्या आपल्यापैकी अनेकांनी वाचलं अथवा पाहिलं असेल, मात्र, आता व्हायरल होणाऱ्या या बातम्यांवर अखेर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नऊ वर्षात एकही सुट्टी घेतलेली नाही. गेल्या नऊ वर्षांपासून मोदी सातत्याने केवळ आणि केवळ कामच करत आहेत. दाखल करण्यात आलेल्या RTI च्या उत्तरात पंतप्रधान कार्यलयाने ही माहिती दिली आहे. आरटीआय कार्यकर्ते पी शारदा यांनी हे आरटीआय दाखल केले होते. (PMO On Narendra Modi Holiday)

Letsupp Special : Maratha Reservation आंदोलनाचे नवीन हिरो मनोज जरांगे; पण त्यांच्या मागण्या मान्य करण्यात या आहेत अडचणी…

पी शारदा यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कितीवेळा सुट्टी घेतली याबाबत माहिती मागितली होती. त्यासोबतच पंतप्रधान झाल्यानंतर मोदींनी PMO कार्यालयात किती दिवस उपस्थिती दर्शवली तसेच मोदींनी पंतप्रधान झाल्यानंतर किती कार्यक्रमांना हजेरी लावली असे दोन प्रश्न विचारण्यात आले होते.

दाखल करण्यात आलेल्या या RTI वर उत्तरादाखल PMO कार्यालयाकडून माहिती देण्यात आली आहे. ज्यात पंतप्रधान मोदी पंतप्रधानपदावर विराजमान झाल्यापासून म्हणजेच 2014 पासून अहोरात्र कार्यरत असून, त्यांनी गेल्या नऊ वर्षात एकही सुट्टी घेतली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच कार्यक्रमांना लावलेल्या हजेरीबाबत PMO कार्यालयाकडून गेल्या 9 वर्षात मोदींनी देश-विदेशातील 3000 हून अधिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतल्याचे सांगितले आहे.

Maratha Reservation : “भरला सरकारच्या पापाचा घडा; अजितदादा बाहेर पडा” : बारामतीमधूनच वाढला दबाव

मोदींनी 20 वर्षांपासून सुट्टी घेतलेली नाही
मोदींच्या सुट्टीबाबत आरटीआयच्या माध्यमातून माहिती मागवण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. याआधीदेखील 2015 मध्ये मोदींच्या उपस्थितीबाबत माहिती विचारण्यात आली होती. त्यावेळी मोदी कधीच सुट्टी घेत नसल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, ही माहिती केवळ पंतप्रधानपदाची सुत्र हातात घेतल्यानंतरच्या वर्षभरातीलच होती. परंतु, ताज्या माहितीत मोदींनी गेल्या नऊ वर्षात एकही दिवस सुट्टी घेतली नसल्याचे सांगण्यात आले आहे.

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकून यांनी 2021 मध्ये मोदींनी गुजरातचे मुख्यमंत्री आणि देशाचे पंतप्रधान झाल्यापासून म्हणजेच तब्बल 20 वर्षांपासून एकही दिवस सुट्टी घेतलेली नसल्याचे सांगितले होते. यावेळी त्यांनी मोदींवर जेवढे आरोप केले जात आहे तेवढे ते अधिक भक्कम होत असल्याचेही म्हटले होते.

Tags

follow us