PM Modi Oath Ceremony : देशात एनडीएचे सरकार (NDA Govt) स्थापन होत असून नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज ( 9 जून ) तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ ( Oath Ceremony ) घेणार आहेत. त्यांच्यासोबत एकूण 52 ते 55 मंत्री शपथ घेऊ शकतात. या शपथविधी सोहळ्याला अनेक राजकीय नेते हजेरी लावणार आहेत. त्याअगोदर ते आज ( 9 जून ) सकाळी राजघाटावर पोचले आहेत या ठिकाणी ते महात्मा गांधी यांच्यासमोर नतमस्तक होणार आहेत त्यानंतर ते माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या समाधीचे देखील दर्शन घेणार आहेत.
निलेश लंकेंच्या डोळ्यात दोनदा पाणी अन् विखेंचा करेक्ट कार्यक्रम; काकडेंकडून अनेक गुपिते उघडकीस
नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांचा पंतप्रधानपदाची शपथ घेतील. त्यांच्याबरोबर आणखी काही खासदार शपथ घेतील. यासाठी आज सकाळपासूनच भाजपसह एनडीएतील घटकपक्षांच्या खासदारांचे फोन खणखणत आहेत. खासदारांना मंत्रिपदासाठी विचारणा होत आहे. मात्र या सगळ्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं नाव मागे पडलं आहे. कालपर्यंत प्रफुल पटेल यांचं मंत्रिपद निश्चित मानलं जात होतं. परंतु, आज दिवस उगवल्यानंतर मात्र अजित पवारांच्या खासदारांना मंत्रिपदासाठी अजूनही फोन आलेला नाही अशी माहिती मिळत आहे. या घडामोडींमुळे अजित पवारही नाराज झाल्याचे बोलले जात आहे.
Muralidhar Mohol, Raksha Khadase will be minister in Modi Cabinet : देशात एनडीएचे सरकार (NDA Govt) स्थापन होत असून नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज ( 9 जून ) तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ ( Oath Ceremony ) घेणार आहेत. त्यांच्यासोबत एकूण 52 ते 55 मंत्री शपथ घेऊ शकतात. त्यामध्ये राज्यातील 5 जणांना फोन आलेले आहेत. त्यामध्ये पुण्याच्या मुरलीधर मोहोळांसह रक्षा खडसे, प्रतापराव जाधवांची देखील केंद्रीय मंत्रिपदावर वर्णी लागणार आहे.
शपथविधी समारंभासाठी उपस्थित राहणाऱ्या अतिथींसाठी आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे. राष्ट्रपती भवनाने समारंभाच्या तयारीची एक चित्रफीत शनिवारी प्रसिद्ध केली. या समारंभासाठी मोठ्या संख्येने खुर्च्या मांडल्या आहेत. त्या पांढऱ्या कपड्याने झाकलेल्या आहेत. समारंभासाठी लाल गालिचा अंथरण्यात आला आहे. आज रविवारी संध्याकाळी 7.15 वाजता हा शपथविधी सोहळा सुरू होणार आहे.
त्याचबरोबर या कार्यक्रमानंतर स्वादिष्ट अशा मेजवानीच आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रपती भवनाच्या स्वयंपाकघरातील खास पदार्थ समारंभानंतर आयोजित मेजवानीत अतिथींना देण्यात येणार आहे. असे अधिकाऱ्यांनी सांगितले. देशातील सर्व प्रमुख प्रदेशांतील स्वादिष्ट पदार्थांसह पारंपरिक शाकाहारी थाळी दिली जाणार आहे.