Download App

मोदींच्या भाषणानंतर सरकारी कंपन्यांच्या शेअर्ससाठी ‘सोनिया’चे दिन ; गुंतवणुकदार मालामाल

  • Written By: Last Updated:

PM Modi Speech On Investment : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल (दि. 10) संसदेत शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना सरकारी कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला होता. एवढेच नव्हे तर, मोदींनी ज्या सरकारी कंपन्यांची नावे भाषणादरम्यान घेतली होती. त्यांच्या शेअर्समध्ये आज (दि.11) तेजी दिसून आली. एलआयसी, एनबीसीसी, एचएएल, पीएनबीसह अनेक सरकारी शेअर्समध्ये सकाळच्या सत्रात तेजी पाहण्या मिळाली त्यामुळे गुंतवणुकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

लोकसभेतील अमित शाहांचे सर्व दावे खोटे; राहुल गांधींच्या मदतीसाठी ‘कलावती बांदूरकर’ मैदानात

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवारी (दि. 10) संसदेत सुमारे 2 तास 13 मिनिटांचे प्रदीर्घ भाषण केले. या भाषणात त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. यात त्यांनी विरोधक करत असलेल्या दोन सरकारी कंपन्यांचाही उल्लेख करत, विरोध होणाऱ्या सरकारी कंपन्यांमध्ये गुंतवणूक करा त्या तुम्हाला मालामाल करतील असा सल्ला गुंतवणूकदारांना दिला.

मोदींनी HAL आणि LIC या दोन सरकारी कंपन्यांचे उदाहरण यावेळी दिले होते. मोदींच्या या भाषणाचा परिणाम आज (दि. 11) शुक्रवारी शेअर मार्केटमध्ये दिसून आला. शुक्रवारी (दि. 11) बाजाराच्या सुरुवातीच्या सत्रात 232 अंकांची घसरण पाहायला मिळाली. पण सरकारी शेअर्समध्ये तेजी पाहण्यास मिळाली. यात प्रामुख्याने भारत हेवी इलेक्ट्रिक, लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन तसेच सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआयचे शेअर्स तेजीत होते.

आम्ही राज्यातील अनेक नेत्यांच्या महिलांचे फ्लाइंग किस पाहिलेत; राऊतांच्या विधानानं वाद उफळणार

LIC गुंतवणुकदारांमध्ये उत्साह

शेअर बाजारात आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सरकारी कंपनी एलआयसीच्या शेअर्समध्ये तेजी पाहण्यास मिळाली. सकाळ्या सत्रात एलआयसीच्या शेअर्समध्ये 3.16 टक्क्यांची वाढ पाहण्यास मिळाली. यामुळे एलआयसीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

parliament session : अविश्वास प्रस्तावात ‘इंडिया’ हारली अन् ‘एनडीए’ जिंकली! मतदानाआधीच सभात्याग

तर, दुसरीकडे सरकारी कंपनी BEL चे शेअर्समध्ये 2.20 टक्क्यांची वाढ पाहण्यास मिळाली. देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक एसबीआयच्या शेअर्समध्ये सुरुवातीच्या व्यवहारात 0.44 टक्क्यांनी वाढ दिसून आली. कालच्या भाषणात मोदींनी सरकारी कंपनी HAL चे देखीन नाव घेतले होते. त्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये आज सकाळच्या सत्रात 1.20 टक्क्यांनी वाढ दिसून आली. याशिवाय देशातील सार्वजनिक क्षेत्रातील मोठ्या बँकांपैकी बँक ऑफ बडोदा आणि पंजाब नॅशनल बँकेच्या शेअर्समध्येही सकाळच्या सत्रात तेजीचा कल होता.

HAL-LIC वर काय म्हणाले होते मोदी 

लोकसभेत बोलताना मोदींनी विरोधकांकडून HAL आणि LIC कंपन्यांवरून करण्यात येणाऱ्या टीकेलाही सडेतोड उत्तर दिले. ते म्हणाले की, जगात आपल्या संरक्षणासाठी हेलिकॉप्टर बनवणारी सरकारी कंपनी HAL ची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून करण्यात आला. विरोधकांकडून संबंधित कंपनीच्या कामगारांना भडकवले. मात्र, यानंतरही HAL एका वेगळ्या उंचीवर जाऊन पोहोचली आहे.

श्रीराम ग्रुपच्या आर त्यागराजन यांनी केलं 6 हजार 210 कोटींचं दान, स्वत:साठी ठेवलं फक्त एक छोट घर

एलआयसीबाबत बोलताना मोदी म्हणाले की, गरीबांचा कष्टाचा पैसा सत्ताधाऱ्यांनी उधळून लावला अशी टीका करण्यात आली होती. पण आज हीच कंपनी एका मजबूत स्थितीत आहे. विरोधकांची सरकारी कंपनीवरील ही टीका सरकारी कंपनीवर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठीची उत्तम संधी असल्याचे मोदी म्हणाले होते.

Tags

follow us