लोकसभेतील अमित शाहांचे सर्व दावे खोटे; राहुल गांधींच्या मदतीसाठी ‘कलावती बांदूरकर’ मैदानात
Amit Shah Speech On No Confidence Motion : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी (दि. 9) लोकसभेत विरोधकांनी मोदी सरकार विरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर उत्तर दिले. यावेळी त्यांनी काँग्रेससह राहुल गांधींवर महाराष्ट्राच्या कलावती बांदूरकरांचा उल्लेख करत जोरदार हल्लाबोल केला होता. मात्र त्यानंतर आता या कलावती बांदूरकरांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यात त्यांनी अमित शाहांची पोलखोल केली. तर राहुल गांधींच्या मदतीसाठी ‘कलावती बांदूरकर’ मैदानात उतरल्याचं पाहायला मिळत आहे. (Amit Shah Criticize Rahul Gandhi met Kalavati Bandurkar wasn’t give her anything now she dismissed Claimed )
संसद टीव्हीवर फक्त 4 मिनिटे दिसले राहुल गांधी! कॉंग्रेस खवळली
काय म्हणाल्या कलावती बांदूरकर?
लोकसभेत अमित शाह यांनी केलेल्या दाव्यावर कलावती बांदूरकर म्हणाल्या की, राहुल गांधी मला भेटायला आले होते. तेव्हा त्यांनी मला आर्थिक मदत दिली. तसेच राहुल गांधी आल्यावर त्यांनीच मला वीज आणून दिली. तर मला मिळालेलं घरकुल योजनेतील घरं त्यांनी अगोदरच मंजूर केलं होतं. पण ते मिळालं नव्हतं. मात्र 2013-14 मध्ये मला हे घरही मिळालं. हे सगळं राहुल गांधी आल्यावर मिळालं. पण मोदी आल्यापासून मला कोणतीही आर्थिक मदत मिळेलेली नाही. सर्वांना 2 हजार रूपये मिळतात. मी गॅस देखील विकत घेतला आहे. तो सरकारने दिलेला नाही. त्यामुळे लोकसभेत अमित शाह जे बोलले ते खोटं आहे. मला राहुल गांधींनीच आर्थिक मदत केली आहे.’ अशी प्रतिक्रिया कलावती यांनी दिली.
कलावती बांदूरकरांनी काढली अमित शाहांच्या 'त्या' दाव्यातील हवा…
–#Rahul_is_Back #AmitShah #ParliamentSession #letsuppmarathi pic.twitter.com/UU34BkiYhW— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) August 10, 2023
तुम्ही ज्या महिलेच्या घरी जेवले, तिला मोदींना गॅस, वीज दिली; शाहांचा राहुल गांधींवर जोरदार प्रहार
काय म्हणाले होते अमित शाह?
लोकसभेत अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना अनेक मुद्द्यांवरून घेरले. कलावतीचा उल्लेख करत अमित शाह यांनी राहुल यांच्यावर निशाणा साधला. शाह म्हणाले की, राहुल गांधी कलावती यांच्या घरी जेवणासाठी गेले होते. त्यांच्या सरकारने (UPA) कलावतींसाठी काहीही केले नसून या उलट मोदी सरकारने कलावतींना घर, वीज आणि धान्य दिल्याचा उल्लेख केला होता.
मात्र कलावती बांदूरकरांनी अमित शाह यांनी केलेले सर्व दावे अक्षरशः फेटाळून लावले आहेत. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह संसदेत खोटं बोलले आहेत का? अशी चर्चा सुरू झाली आहे.