Download App

pahalgam terrorist attack : दहशतवाद्यांना अजेंडा यशस्वी होऊ देणार नाही, कुणालाही सोडणार नाही; पंतप्रधान मोदींचा इशारा

PM Modi Warn on pahalgam terrorist attack on Tourist : जम्मू-काश्मीरमध्ये पहलगाम या ठिकाणी पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. यामध्ये केलेल्या हल्ल्यात मृतांचा आकडा वाढला आहे. तर, अनेक जण जखमी झाले आहेत. पहलगाममधील बैसरन खोऱ्याच्या वरच्या भागात हा हल्ला झाला आहे. या घटनेनंतर या हल्ल्यावर सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील सुत्र हलवली आहेत.तसेच आता यावर त्यांनी संतप्त प्रतिक्रिया देखील दिली आहे.

काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

जम्मू-काश्मीरमध्ये पहलगाममधील दहशतवाद्यांनी हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. ज्यांनी त्यांचे नातेवाईक या हल्ल्यात गमावले त्यांच्यासोबत माझ्या संवेदना आहेत. तसेच जखमी लवकर बरे व्हावेत यासाठी मी प्रार्थना करतो. हल्ल्याने प्रभावित झालेल्या सर्वांना सर्वतोपरी मदत केली जात आहे. या घृणास्पद कृत्यामागे असलेल्या दहशतवाद्यांना सोडलं जाणार नाही. त्यांचा दृष्ट अजेंडा यशस्वी होऊ दिला जाणार नाही. दहशतवाद्यांविरोधात लढण्याचा आपला निर्धार पक्का आहे आणि तो आणखी मजबूत होणार आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ला, महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा मृत्यू; मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती

दरम्यान या हल्ल्यावर सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील सुत्र हलवली आहेत. पंतप्रधानांनी गृहमंत्री अमित शाह यांना आवश्यक ते सर्व पावलं उचलून योग्य उपाययोजना करण्यास सांगितले आहे. तसेच पंतप्रधानांनी केंद्रीय गृहमंत्र्यांना घटनास्थळाला भेट देण्यास सांगितले आहे.पंतप्रधान मोदींशी बोलल्यानंतर, शाहा यांनी त्यांच्या निवासस्थानी अधिकाऱ्यांची एक महत्त्वाची बैठक बोलावली. त्यानंतर आता अमित शाह श्रीनगरला रवाना झाले आहेत.

चित्रपताका महोत्सवाला दुसऱ्या दिवशी उदंड प्रतिसाद

अलिकडेच पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी हिंदूंविरुद्ध एक भडकाऊ विधान केले होते. यानंतर लगेचच दहशतवाद्यांनी पर्यटकांना लक्ष्य केले आहे. त्यात अवघ्या काही दिवसात अमरनाथ यात्रादेखील सुरू होणार असून, पहलगाम हे पर्यटन क्षेत्र असल्याने आणि आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू होणार असल्याने येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक भेट देण्यासाठी येत असतात. मात्र,आजच्या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली असून, पाकिस्तानस्थित दहशतवादी गट लष्कर-ए-तैयबाची स्थानिक शाखा असलेल्या रेझिस्टन्स फ्रंटने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

follow us